सावंतवाडीत 'भंडारी चषक' क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन

Edited by: विनायक गांवस
Published on: January 31, 2026 20:29 PM
views 159  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्यावतीने आयोजित  "भंडारी चषक" क्रिकेट स्पर्धा २०२६ चे शानदार उदघाटन येथील जिमखाना मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन तर संजय पिळणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं.

यावेळी नगरसेवक देवा टेमकर, गुरुनाथ पेडणेकर, दिलीप पेडणेकर, बाळा आकेरकर, देविदास आडारकर, प्रतिभा कांबळी, नारायण मसुरकर, राजेंद्र बिर्जे, भरत कांबळी, संतोष वैज, लवू कुडव, सुरेश राऊळ, हनुमंत पेडणेकर, उत्तम कुडव, बाळ चोडणकर, निलेश कुडव, सिद्धार्थ पराडकर, प्रदीप नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.