
सावंतवाडी : स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान व सावंतवाडी नगरपरिषदेच्या 'माझी वसुंधरा अभियान' यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्रा. मिलिंद द. भोसले स्मृतीप्रीत्यर्थ ''आपण व्यक्त होऊया!'' समितीकडून तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते दुसरीसाठी रंगभरण तर इ. तिसरी व चौथीसाठी चित्रकला स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. रविवार १५ मार्च २०२६ रोजी दु. ३.३ ० वाजल्यापासून जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानमध्ये स्पर्धकांच्या नावनोंदणीला सुरुवात होणार असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी या सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दोन गटात ही स्पर्धा होणार असून प्रथम गट १ ली ते २ री यांच्यासाठी रंगभरण स्पर्धा तसेच द्वितीय गटात ३ री व ४ थी साठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकला स्पर्धेसाठी माझ कुटुंब, माझी शाळा, माझ सुंदर गाव / माझं सुंदर शहर हे विषय ठेवण्यात आले आहेत. दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक, उत्तेजनार्थ २ क्रमांकांना आकर्षक बक्षिसे तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
दरम्यान, स्पर्धेस्थळी दु. ३. ३० वा. उपस्थित राहून नावनोंदणी आवश्यक आहे. प्रवेश विनामूल्य असणार आहे. चित्रकाढण्यासाठी २ तासांचा अवधी दिला जाणार आहे. दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर चित्र काढणे बंधनकारक राहणार आहे. रंगभरण व चित्र काढण्यासाठी कागद आयोजकांकडून दिला जाणार आहे. तर पेन्सिल, पॅड, रबर, कलर आदी साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असून बक्षीस वितरण समारंभ त्वरीत सायंकाळी जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे होणार आहे. तसेच याच कार्यक्रमाचे औचित्य साधून स्व. किशोर दत्ताजीराव भोसले स्मृती आरोग्य व सामाजिक सेवा पुरस्कार 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सावंतवाडी' यांना प्रदान करण्यात येणार आहे. तरी या रंगभरण व चित्रकला स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजी उपस्थित राहून स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 9075119473 / 9011604509 साधावा.














