टेबल टेनिसमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचं यश

Edited by: विनायक गांवस
Published on: August 24, 2024 09:38 AM
views 67  views

सावंतवाडी : जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या १४ वर्षाखालील मुलांच्या गटातून आठवीतील मंथन सावंत भोसले व अब्दुल रहमान यांनी विजय मिळवत विभागीय फेरीसाठी आपले स्थान पक्के केले. तसेच १९ वर्षाखालील मुलांच्या गटातून दहावीतील दीप गावडे, शारिक बांदेकर व सेल्टन रॉड्रिक्स यांची विजय मिळवत विभागीय फेरीत प्रवेश मिळवला. 

ही स्पर्धा मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन हरमलकर व एस्टर परेरा यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले व मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी अभिनंदन केले व पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.