अंध युवा मुलींसाठी सोलापुरात राज्यस्तरीय क्रिकेट प्रशिक्षण शिबिर

Edited by: विनायक गांवस
Published on: April 22, 2026 17:33 PM
views 23  views

सावंतवाडी  : क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (CABM) यांच्या वतीने दिनांक ४ मे ते २४ मे या कालावधीत अंध युवा मुलींसाठी विशेष क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर येथे होणाऱ्या या शिबिरासाठी नवीन महिला खेळाडूंनी आपली नावे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी निवास, भोजन, खेळाचे साहित्य, युनिफॉर्म आणि बूट या सर्व सुविधा विनामूल्य पुरवण्यात येणार आहेत. ज्या खेळाडूंनी यापूर्वी कोणत्याही शिबिरात भाग घेतलेला नाही, अशा नवीन खेळाडूंना या माध्यमातून महाराष्ट्र राज्य संघासाठी आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

इच्छुक खेळाडूंनी आपले नाव, जिल्हा, अंधत्वाचे प्रमाणपत्र किंवा युडीआयडी कार्ड, अंधत्वाचे प्रमाण तसेच युनिफॉर्म व बूटची साईज या माहितीसह २५ तारखेपर्यंत आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी ९८६९३२९१४१ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा blindcabm@gmail.com या ईमेलवर माहिती पाठवावी. हा उपक्रम केवळ अंध युवा मुलींसाठीच आयोजित करण्यात आला असून जास्तीत जास्त खेळाडूंनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनने केले आहे.