राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गच्या जलतरणपटूची चमकदार कामगिरी

लीनांशा नाईकने पटकावला ऑलराऊंडर चषक
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 03, 2026 11:49 AM
views 69  views

सिंधुदुर्गनगरी : इचलकरंजी येथे पार पडलेल्या इनविटेशनल राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जलतरणपटूनी चमकदार कामगिरी केली त्यात लीनांशा हितेश नाईक या चिमुकलीने ऑलराऊंडर चषक पटकावला आहे.

आय एम सी क्लब ऑफ इचलकरंजी व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इनविटेशनल  इंटरस्टेट स्विमिंग कॉम्पिटिशन 2026 ही शंकरराव पुजारी ओलंपिक साईज स्विमिंग पूल इचलकरंजी  मियुनिसिपल कॉर्पोरेशन येथे पार पडली ज्यामध्ये लीनांशा हितेश नाईक या चिमुकलीने 50 मीटर ब्रेस्ट्रोक मध्ये द्वितीय क्रमांक ,  50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये प्रथम क्रमांक  व 50 मीटर बटरफ्लाय मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला सोबतच तिला ऑलराऊंडर चषक सुद्धा मिळाले त्याचबरोबर समर्थ निबरे या चिमुकल्याने 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये  द्वितीय  क्रमांक पटकाविला बाकी इतर जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी दाखवत चौथा व पाचवा क्रमांक पटकाविला ज्यामध्ये उत्कर्ष विद्याधर  निवतकर , राघव वालावलकर, वेदांत साठे, शिवांश खोत , स्वराज सावंत ,वेदांत  फोपळे , मार्क डिसूजा , रिषभ जाधव इत्यादी स्पर्धकांनी सहभाग केला या सर्व जलतरणपटूंना प्रशिक्षण हे  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य जलतरण प्रशिक्षक  प्रवीण सुलोकार यांनी  सिंधुदुर्गनगरी जलतरण तलाव येथे दिले .

सर्व स्पर्धकांचे त्यांनी कौतुक करून अभिनंदन केले तसेच सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनीही सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विजयी स्पर्धकांना बक्षीस इव्हेंट डायरेक्टर गंगाराम बर्गे, जलतरण स्पर्धा इचलकरंजी व आनंद माने अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना अध्यक्ष आनंद माने  यांच्याकडून देण्यात आले