LIVE UPDATES

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी 2025 गेम मध्ये सिद्धी साळुंखे हिला सांघिक कास्य पदक

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: November 29, 2025 17:50 PM
views 300  views

राजस्थान येथे 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान चालू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम मध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे नेतृत्व करत रिकव या धनुष्य प्रकारात सावर्डे येथे राहणारी सिद्धी सुरज साळुंखे हिला सांघिक कास्य पदक मिळाले. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून 20 विद्यापीठाचे संघ आले होते खेलो इंडिया युनिव्हर्सिटी खेळामध्ये धनुर्विद्या खेळात पदक मिळवणारी रत्नागिरी मधील सिद्धी ही एकमेव खेळाडू आहे.

यावर्षी भटिंडा पंजाब येथे झालेल्या विद्यापीठ स्पर्धेत ती सहभागी झाली होती. तसेच अहिल्यानगर येथे झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले त्याचबरोबर राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर एकूण 53 मेडल्स आजपर्यंत मिळवले आहेत.  शाळेच्या वेळी ती एस व्ही जेसीपी क्रीडा संकुल डेरवण येथे सराव करत होती. आता ती पुण्यातील ओंकार घाडगे यांच्या अकॅडमी मध्ये सराव करत आहे. दहा वर्षे ओंकार घाडगे  यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण तिला मिळालेले आहे. कालावधीत भारतीय संघाच्या कोचिंग कॅम्पमध्ये जागा मिळाली आहे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.