LIVE UPDATES

जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेत मदर क्वीन्सच्या विद्यार्थीनींचं यश

Edited by:
Published on: November 15, 2025 10:58 AM
views 191  views

सावंतवाडी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तर्फे आयोजित जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेत वैयक्तिक क्रीडा प्रकारात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थीनींनी उत्तुंग कामगिरी बजावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. 

14 वर्षे खालील मुली या वयोगटात जिल्हास्तरीय वैयक्तिक कुराश स्पर्धेत 40 किलो खालील वजनी गटात कु.दृष्टी यशवंत मुंडये हिने प्रथम क्रमांक पटकावला तसेच 48 किलो खालील वजनी गटात कु.प्रचिती लक्ष्मण गिरप  हिने देखील प्रथम क्रमांक पटकावला या दोन्ही खेळाडूंची विभाग स्तरासाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल  सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब  खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे  भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर , क्रीडा शिक्षक श्री. भूषण परब तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.