LIVE UPDATES

रोलर स्केटिंग स्पर्धेत स्पृहा नार्वेकरचं यश

Edited by: विनायक गांवस
Published on: October 09, 2025 18:27 PM
views 397  views

सावंतवाडी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीची विद्यार्थीनी कु.स्पृहा भूषण नार्वेकर हिने 11वर्षे खालील वयोगट मुली या प्रकारात आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवून तृतीय क्रमांक पटकावत उत्तुंग यश संपादित करून विभागस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान बळकट केले आहे.

या यशाबद्दल  सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब  खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे  भोंसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर , क्रीडा शिक्षक भूषण परब तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.