LIVE UPDATES

समुद्रकिनारी विराट कोहलीचं १५ फूटांचं भव्य चित्र

Edited by:
Published on: June 29, 2025 21:44 PM
views 103  views

सिंधुदुर्ग : कला आणि क्रिकेट यांचा अनोखा संगम कुडाळ तालुक्यात पाहायला मिळाला आहे. कुडाळ-पाट परिसरातील सुप्रसिद्ध चित्रकार अल्पेश घारे यांनी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचं तब्बल १५ फूट उंचीचं भव्य पोर्ट्रेट समुद्रकिनारी साकारलं आहे. विशेष म्हणजे हे चित्र निवती येथील समुद्रकिनारी रांगोळी आणि कलर स्प्रेच्या माध्यमातून रेखाटण्यात आलं असून, पावसाळ्याच्या प्रतिकूल हवामानातही अल्पेश यांनी जिद्दीने हे काम पूर्ण केलं. जोरदार पाऊस, वारं असूनही त्यांनी दीड तासामध्ये हे भव्य चित्र पूर्ण केलं.

या अद्वितीय कलाकृतीसाठी अल्पेश यांना विठ्ठल माधव, भावेश घारे, आणि मंजिरी घारे या त्यांच्या मित्रमंडळींची मोलाची साथ मिळाली. अल्पेश घारे हे विराट कोहली यांचे खूप मोठे चाहते असून, क्रिकेटप्रेमातूनच त्यांना ही कलाकृती साकारण्याची प्रेरणा मिळाली.