स्टेपिंग स्टोन स्कूलचं कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत उल्लेखनीय यश

Edited by: विनायक गांवस
Published on: May 02, 2026 15:38 PM
views 7  views

सावंतवाडी : स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी WTSKF (World Traditional Shotokan Karate Federation ) अंतर्गत घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून यशस्वीरित्या परीक्षा पूर्ण केली. 

ही परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात आली होती. यामध्ये इयत्ता ३ री मधील स्वरा राणे, काव्या कांबळे, राधिका शेटकर तर इयत्ता ४ थी मधील नाविण्या कोरगावकर, स्वरा वालावलकर, एकता परब, आरोही गावडे, अवनी गावडे, माहिद आगा, अरमान मलानी, इयत्ता ५ वी मधील अद्वैत ठाकूर, नुमान नदाफ, तसेच इयत्ता ६ वी मधील माझ पटेल, विवान बिरमोले व इयत्ता ७ वी मधील आराध्य नाटेकर या विद्यार्थ्यांनी वरील परीक्षेत सहभागी होऊन आपले सुयश प्रदर्शित केले. यासाठी प्रशालेचे कराटे शिक्षक मंगेश घोगळे यांचे मार्गदर्शन लाभले. कराटे क्षेत्रात ही विद्यार्थ्यांची पहिली पायरी असून यामुळे त्यांच्यामध्ये शिस्त, एकाग्रता आणि स्वसंरक्षणाची जाणीव अधिक दृढ निर्माण होईल. तसेच, शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाला साजेसा हा यशस्वी टप्पा असून विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मुले भविष्यात ब्लॅक बेल्टपर्यंत मजल मारतील यात तिळमात्र शंका नाही.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्यावतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेचे संचालक रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका प्राची साळगावकर शुभेच्छा दिल्या.