LIVE UPDATES

आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत रिया मयेकरला सुवर्णपदक

आठ वर्षांच्या कठोर सरावाचे फलित; राजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 02, 2026 06:17 PM
views 38  views
Rajapur's Riya Mukesh Mayekar wins a gold medal at the Mumbai University Intercollegiate Taekwondo Championship 2026-27.

राजापूर : मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा २०२६-२७ मध्ये राजापूरची कन्या कु. रिया मुकेश मयेकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथे २५ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

रिया सध्या खालसा महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असून, गेल्या आठ वर्षांपासून ती तायक्वांदो अकॅडमी, राजापूर येथे प्रशिक्षक मुकेश शांताराम नाचरे यांच्या मार्गदर्शनाखाली तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत आहे. सातत्यपूर्ण सराव, खेळातील कौशल्य, जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर तिने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

रिया हिच्या या यशाबद्दल खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक तसेच महाविद्यालयाचे प्रशिक्षक राजेश मुरव यांनी तिचे अभिनंदन केले.

तायक्वांदो अकॅडमी, राजापूरचे अध्यक्ष अभिजित जनार्दन तेली, उपाध्यक्ष मुकेश मयेकर, खजिनदार संजय मांडवकर, सदस्य दीपक धालवलकर, संदीप राऊत, प्रसाद शिवलकर, मानसी दिवटे, दीपिका पवार, अद्वैत अभ्यंकर, निलेश रहाटे तसेच महिला प्रशिक्षिका मधुरा नाचरे यांनीही रियाचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा, सचिव सुभाष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी आणि तायक्वांदो अकॅडमी, राजापूर परिवाराच्या वतीने रियाचे अभिनंदन करण्यात आले.

दरम्यान, याच स्पर्धेत राजापूरच्या श्रुतिका विजय मांडवकर आणि आकाश योंगेद्र बरई यांची पंच म्हणून निवड करण्यात आली होती. रियाच्या सुवर्णपदकामुळे राजापूरच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi News : भाग्योदय कॉम्प्लेक्समधील सदस्यांची श्रमदानातून स्वच्छता
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी आर्थिक मदत
November 02, 2026
Mangaluru man converts his two-wheeler into a mobile tyre puncture repair shop to help stranded motorists.
Mobile Puncture Repair Shop : चालत्या - बोलत्या पंक्चर दुकानाची कमाल
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : स्वयं सहाय्यता समूहांचा उत्पादित फराळ खरेदी करा
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update#
Sports News : जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत आराध्या गावडे प्रथम
November 02, 2026
India vs New Zealand T20 Series 2026, Aakash Chopra reacts to India's 3-2 series win
भारताने सिरिज जिंकली, तरी आकडेवारीत न्यूझीलंड सरस! आकाश चोप्रांनी ट्रोलिंगवर दिले सडेतोड उत्तर
November 02, 2026
Manisha Bhanwala Celebrates Gold Medal Victory at World Wrestling Championship
Manisha Bhanwala : जागतिक कुस्ती स्पर्धेत मनीषा भानवालाचा ऐतिहासिक पराक्रम
October 31, 2026
India vs New Zealand 5th T20 Match Team India and New Zealand Cricket Teams
India vs New Zealand 5th T20 Match : रविवारी भारत-न्यूझीलंडमध्ये पाचवा टी-२० सामना
October 31, 2026