LIVE UPDATES

Sindhudurg News : माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी आर्थिक मदत

एक लाखाचा धनादेश प्रदान
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 02, 2026 06:34 PM
views 30  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी : माजी सैनिकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या कल्याणकारी निधी योजनेतून माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

माजी सैनिक संतोष मेघश्याम सावंत, रा. सबनीसवाडा, ता. सावंतवाडी यांचे पाल्य स्वप्नील सावंत हा शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये रशियातील Kemerovo State University, Kemerovo येथे एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे.

त्याच्या परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या कल्याणकारी निधी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते माजी सैनिक संतोष सावंत यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रभारी सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण कोळी तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

सैनिक कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक तसेच त्यांचे अनाथ पाल्य व अवलंबित यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून शैक्षणिक मदत, स्वयंरोजगार आणि पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.

जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दूरध्वनी क्रमांक 02362-228820 वर संपर्क साधावा.


ताजी बातमी

View all

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ‘ब्रिक्स शाश्वत जीवनशैली सप्ताह २०२६’
November 02, 2026
Coal India subsidiary SECL files DRHP with SEBI for its proposed IPO of 66.81 crore shares.
SECL IPO 2026 : कोल इंडियाची मोठी घोषणा! एसईसीएलचा आयपीओ येणार बाजारात, ४ नोव्हेंबरला शेअर्सवर डिव्हिडंडची संधी
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi News : भाग्योदय कॉम्प्लेक्समधील सदस्यांची श्रमदानातून स्वच्छता
November 02, 2026
Mangaluru man converts his two-wheeler into a mobile tyre puncture repair shop to help stranded motorists.
Mobile Puncture Repair Shop : चालत्या - बोलत्या पंक्चर दुकानाची कमाल
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ‘ब्रिक्स शाश्वत जीवनशैली सप्ताह २०२६’
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi News : भाग्योदय कॉम्प्लेक्समधील सदस्यांची श्रमदानातून स्वच्छता
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : स्वयं सहाय्यता समूहांचा उत्पादित फराळ खरेदी करा
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
IDOL Teacher Award : आयडॉल शिक्षक पुरस्कारासाठी सतीशकुमार कर्ले यांची निवड
November 02, 2026