LIVE UPDATES

Sawantwadi News : भाग्योदय कॉम्प्लेक्समधील सदस्यांची श्रमदानातून स्वच्छता

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 02, 2026 06:42 PM
views 40  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : खासकीलवाडा गोठण सावंतवाडी येथील भाग्योदय कॉम्प्लेक्स मधील सर्व सदस्यांनी 2026 दीपावलीचे औचित्य साधून श्रमदानाने इमारतीच्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता केली. 

ऑक्टोबर 2026 च्या मासिक  मीटिंगमध्ये दिवाळीपूर्वी संकुलाच्या इमारती सभोवती तसेच टेरेस, जिने यांची साफसफाई करायला पाहिजे यासाठी कोणालातरी साफसफाई करणाऱ्याला बघितले पाहिजे अशी मासिक मीटिंगमध्ये चर्चा सुरू झाली. यावेळी सर्व सदस्यांनी एका स्वरात सांगितले की यावेळी आपणच सर्वजण श्रमदानाने सर्व साफसफाई करूया.याला उपस्थित सर्व सदस्यांनी एका स्वरात अनुमती दिली.

यासाठी रविवार निश्चित करून प्रत्यक्षात सर्व महिला व पुरुष तसेच मुलांनीही सहभाग घेऊन साफसफाईची मोहिम पूर्ण केली. यावेळी सदस्य काशीराम गावडे यांनी स्वतःच्या ग्रास कटरने इमारती सभोवतालचे गवत कापले.

महिलांनी झाडूने कापलेले गवत बाजूला केले. पुरुषांनी पाळ, कोयत्याने वाढलेली छोटी तसेच मोठी झाडी तोडली.काही सदस्यांनी महिलांनी गोळा केलेला कचरा कचराकुंडीत टाकला.अशाप्रकारे भाग्योदय संकुलाची साफसफाई सर्व सदस्यांच्या श्रमदानातून पूर्ण झाली.

यावेळी झालेली स्वच्छता पाहून स्वच्छता जिथे घरोघरी ,आरोग्य तिथे वास करी याचा मात्र प्रत्यय आला.यावेळी सर्वांचे मनोमिलन व एकजुट पाहून परिसरातील लोकांनीही सर्वांचे कौतुक केले.

सर्व उपस्थित सदस्यांना सुजाता सावंत यांच्याकडून अल्पोपहार देण्यात आला. यावेळी सुनीता गावडे,सुजाता सावंत,स्वाती गावडे, सुधा गावडे, मानसी परब, योगिनी गवस, स्नेहा चितारी, नलिनी सावंत,, विशाखा पाताडे, कुमारी सीमा सावंत,कुमारी मृणालिनी चितारी आदि महिला तसेच शेखर चितारी, दीपक तारी,यशवंत गवस, राम राठोड, काशिराम गावडे, महेश परब,सुनील गावडे, कांता सावंत इत्यादी पुरुष सदस्य उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट! पुढील ३ ते ४ तासांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता
November 02, 2026
Goa Chief Minister Dr. Pramod Sawant offering prayers at Shri Datta Maharaj Temple in Mangaon, Kudal, Sindhudurg.
Pramod Sawant : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत माणगावच्या श्री दत्त चरणी नतमस्तक
November 02, 2026
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ‘ब्रिक्स शाश्वत जीवनशैली सप्ताह २०२६’
November 02, 2026
Coal India subsidiary SECL files DRHP with SEBI for its proposed IPO of 66.81 crore shares.
SECL IPO 2026 : कोल इंडियाची मोठी घोषणा! एसईसीएलचा आयपीओ येणार बाजारात, ४ नोव्हेंबरला शेअर्सवर डिव्हिडंडची संधी
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट! पुढील ३ ते ४ तासांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता
November 02, 2026
Goa Chief Minister Dr. Pramod Sawant offering prayers at Shri Datta Maharaj Temple in Mangaon, Kudal, Sindhudurg.
Pramod Sawant : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत माणगावच्या श्री दत्त चरणी नतमस्तक
November 02, 2026
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ‘ब्रिक्स शाश्वत जीवनशैली सप्ताह २०२६’
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी आर्थिक मदत
November 02, 2026