LIVE UPDATES

Sindhudurg News : स्वयं सहाय्यता समूहांचा उत्पादित फराळ खरेदी करा

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 02, 2026 06:16 PM
views 30  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यातील स्वयं सहाय्यता समूहाने उत्पादित केलेले खाद्य पदार्थ (फराळ) दीपावली निमित्त जिल्हा परिषदेत विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत .सर्व कर्मचारी , अधिकारी, नागरिकांनी खरेदी करून जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले .

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहाकडून उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थ आणि विविध साहित्य विक्रीसाठी जिल्हा परिषदेत खाद्यपदार्थ महोत्सव -२०२६ चे आयोजन केले आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अपूर्वा बासुर, जिल्हा परिषद सदस्य  गोट्या सावंत , मनोज रावराणे , सुमेधा पाताडे , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उदय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व फीत कापून केले.

२ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या खाद्य पदार्थ महोत्सवात जिल्ह्यातील विविध स्वयंसहायता समूहांनी सहभाग घेतला असून लाडू , करंजा , चकली , चिवड़ा,  पोहे  यासह विविध खाद्यपदार्थ विक्री साठी ठेवले आहेत. या व्यतिरिक्त मेंणबत्या, पणत्या, आकाशकंदील यासह विविध वस्तु ठेवण्यात आल्या आहेत .

या सर्व स्टॉलना सर्वच मान्यवरांनी भेट देत खाद्य पदार्थ आणि वस्तुंची माहिती घेतली. तर जिल्ह्यातील सहभागी झालेल्या स्वयंसहायता समूहांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व जिल्हा परिषद कर्मचारी , अधिकारी , लोक प्रतिनिधी, नागरिक यांनी स्वयंसहाय्यता समूहाने उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थ  वस्तूंची खरेदी करून त्यांना सहकार्य करावे. असे आवाहन केले.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi News : भाग्योदय कॉम्प्लेक्समधील सदस्यांची श्रमदानातून स्वच्छता
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी आर्थिक मदत
November 02, 2026
Mangaluru man converts his two-wheeler into a mobile tyre puncture repair shop to help stranded motorists.
Mobile Puncture Repair Shop : चालत्या - बोलत्या पंक्चर दुकानाची कमाल
November 02, 2026
Rajapur's Riya Mukesh Mayekar wins a gold medal at the Mumbai University Intercollegiate Taekwondo Championship 2026-27.
आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत रिया मयेकरला सुवर्णपदक
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi News : भाग्योदय कॉम्प्लेक्समधील सदस्यांची श्रमदानातून स्वच्छता
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी आर्थिक मदत
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
IDOL Teacher Award : आयडॉल शिक्षक पुरस्कारासाठी सतीशकुमार कर्ले यांची निवड
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
तांबुळी माऊली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
November 02, 2026