LIVE UPDATES

Rohit Sharma 52nd international century : रोहित शर्माचा शतकी धमाका! झळकावले ५२ वे आंतरराष्ट्रीय आणि ३५ वे वनडे शतक

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 30, 2026 21:03 PM
views 52  views

गुवाहाटी : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी वनडेमॅच आज गुवाहाटीमध्ये खेळली जात आहे. या सामन्यात फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच वनडे क्रिकेटमध्ये ४०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारतासमोर ४०६ धावांचे लक्ष्य आहे.

भारतीय संघात स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. मागील सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले होते, तर रोहित शर्मा ३२ धावांवर बाद झाला होता.

आजच्या सामन्यात विराट आणि रोहित दोघांकडूनही दमदार कामगिरीची अपेक्षा भारतीय चाहत्यांना असेल. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आधीच ८६ शतके पूर्ण केली आहेत, त्यामुळे त्याच्या ८७ व्या शतकाबाबत मोठी अपेक्षा असेल. तो ही कामगिरी करू शकेल का, हे पाहणे रंजक ठरेल.

रोहित शर्माने ७३ चेंडूत शतक ठोकले असून, यात त्याने १० चौकार आणि ६ षटकार लगावले. हे रोहित शर्माचे ३५ वे वनडे शतक ठरले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या एकूण शतकांची संख्या आता ५२ वर पोहोचली आहे. त्याने कसोटीत १२ आणि टी-२० मध्ये पाच शतके झळकावली आहेत. भारताची धावसंख्या २५० धावांच्या पुढे गेली आहे.

बुधवारी गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात, भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या संघाने इतिहास रचला. कॅरिबियन संघाने वनडे क्रिकेटमध्ये ४०० धावांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

वेस्ट इंडिजच्या इतिहासात एकाच डावात त्यांच्या तीन फलंदाजांनी शतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. आजच्या सामन्यात वेस्ट इंडिजसाठी जॉन कॅम्पबेलने सर्वप्रथम शतक झळकावले आणि १०१ धावा केल्या.

त्यानंतर, शाई होप याने १०४ धावांची खेळी केली आणि अमीर जंगूनेही मिळालेल्या संधीचा फायदा घेत ११४ धावा केल्या. या तीन खेळाडूंच्या शतकांमुळे वेस्ट इंडिज संघाने निर्धारित ५० षटकांत एकूण ४०५ धावा केल्या आणि भारतासमोर ४०६ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून कुलदीप, जडेजा आणि गुरनूर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर प्रसिद्ध कृष्णाने एक बळी घेतला.

भारताचा अंतिम संघ
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), नमन धीर, रवींद्र जडेजा, आकिब नबी, गुरनूर ब्रार, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.

वेस्ट इंडीजचा अंतिम संघ
जॉन कॅम्पबेल, कीसी कार्टी, शाई होप (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अमीर जांगू, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, कीमो पॉल, अल्झारी जोसेफ, शामार जोसेफ, जेडन सील्स आणि विटेल लॉज.