LIVE UPDATES

Sindhudurg Bank Election Postponed : दुष्काळामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 29, 2026 08:42 PM
views 93  views
Sindhudurg District Cooperative Bank election process postponed due to drought conditions.

सिंधुदुर्ग : सहकार क्षेत्रातील निवडणुकांना दुष्काळामुळे ब्रेक लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या २०२६ ते २०३१ या कालावधीतील निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. १९ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार होती. मात्र, दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे ही प्रक्रिया थांबली आहे. आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून पुढील सूचना आल्यानंतरच निवडणूक प्रक्रियेची दिशा स्पष्ट होणार आहे.

राज्यातील ३०४ तालुके दुष्काळी घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा समावेश असल्याने जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांनाही या आदेशाचा फटका बसणार आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यांमध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यानुसार सहकार विभागाने दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सध्याच्या टप्प्यावरच थांबणार असून, पुढील कार्यक्रम अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रक्रिया सुरू होती. पात्र सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविण्यात आले होते. त्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यादीवरील हरकती व अन्य प्रक्रिया पूर्ण करून १९ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे नियोजन होते. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र, शासनाच्या नव्या आदेशामुळे ही प्रक्रिया थांबली आहे.


ताजी बातमी

View all

मालवणच्या स्वच्छता व्यवस्थापनासाठी नगरपरिषदेचा बंगळुरू दौरा
October 29, 2026
Devgad News : देवगड-नांदगाव मार्गावर विनापरवाना चिरे वाहतुकीला दणका
October 29, 2026
Maharashtra government postpones cooperative society elections amid drought conditions.
Maharashtra Cooperative Elections Postponed : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
October 29, 2026
 Lasith Malinga, Paras Mhambrey and Carl Hopkinson part ways with Mumbai Indians ahead of IPL 2027.
आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल, लसिथ मलिंगासह 'या' दोन प्रशिक्षकांना रामराम
October 29, 2026
संबंधित बातम्या

View all

मालवणच्या स्वच्छता व्यवस्थापनासाठी नगरपरिषदेचा बंगळुरू दौरा
October 29, 2026
‘सम्यक’तर्फे कथा, कविता स्पर्धा
October 29, 2026
मांगवलीत ३० ऑक्टोंबरला शेतकरी-पशुपालकांचा मेळावा
October 29, 2026
माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत
October 29, 2026