LIVE UPDATES

बांद्यात दिवाळीनिमित्त डबलबारीचा जंगी सामना, नरकासुर स्पर्धेचेही आयोजन

पिंपळेश्वर युवक मित्रमंडळाचा पुढाकार; लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसे
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 27, 2026 04:01 PM
views 55  views

सावंतवाडी : पिंपळेश्वर युवक मित्रमंडळ, देऊळवाडी-बांदा यांच्या वतीने दिवाळीनिमित्त सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता डबलबारिच्या जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आमची वाडी देऊळवाडी आणि पिंपळेश्वर युवक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हे दोन्ही कार्यक्रम श्री देव पिंपळेश्वर मंदिर परिसरात होणार आहेत.

पिंपळेश्वर युवक मित्रमंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदी आकाश सावंत, उपाध्यक्षपदी गौरव सावंत, खजिनदारपदी आशिष सावंत, तर सचिवपदी रोहन सुपल यांची निवड झाली आहे. डबलबारिच्या सामन्यात श्री बडची देवी प्रासादिक भजन मंडळ, लिंगडाळ-देवगड यांचे बुवा संदीप लोके आणि श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, भरणी यांचे बुवा विनोद चव्हाण यांच्यात सामना रंगणार आहे. संदीप लोके यांना गुरुवर्य विजय परब यांची साथ लाभणार असून, पखवाजावर योगेश सामंत आणि तबल्यावर संदेश सुतार साथसंगत करणार आहेत. तर विनोद चव्हाण यांच्यासोबत पखवाजावर तुषार लोट आणि तबल्यावर शिवराज साथ देणार आहेत.

नरकासुर स्पर्धेसाठी खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी २५,५५५ रुपये, तर द्वितीय क्रमांकासाठी १५,५५५ रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे. बांदा मर्यादित स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी १२,७७७ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ८,८८८ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ४,४४४ रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

दिवाळी स्पेशल लकी ड्रॉ हे या उपक्रमाचे आणखी एक आकर्षण असणार आहे. यामध्ये प्रथम पारितोषिक म्हणून वॉशिंग मशीन, द्वितीय पारितोषिक म्हणून रेफ्रिजरेटर आणि तृतीय पारितोषिक म्हणून कुलर देण्यात येणार आहे. याशिवाय इतर पाच आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.

लकी ड्रॉ कुपनाची किंमत ५० रुपये असून, इच्छुकांनी शुक्रवार, ६ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आशिष सावंत, गौरांक साळगावकर आणि देवेश वारंग यांच्याशी संपर्क साधावा. दिवाळीनिमित्त आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

Maharashtra Cabinet approves 100 percent funding support for Navi Mumbai Chipi flight service
Maharashtra Cabinet Decision : चिपी विमानसेवेला १०० टक्के निधीचे पाठबळ; मंत्रिमंडळ बैठकीत 12 विविध महत्त्वाचे निर्णय
October 27, 2026
Maharashtra government decision on supernumerary posts for 14,747 eligible NHM contractual health workers
राज्यातील १४ हजार ७४७ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
October 27, 2026
सिंधुदुर्ग जिल्हा संस्था संगणकीकरणात राज्यात आणि देशात प्रथम क्रमांकावर : भवानी शंकर
October 27, 2026
Sindhudurg Local Crime Branch arrests absconding suspect in Pune in Kudal crime case
Kudal Crime News : कुडाळमधील गुन्ह्यातील फरार संशयिताला पुण्यातून घेतले ताब्यात
October 27, 2026
संबंधित बातम्या

View all

सिंधुदुर्ग जिल्हा संस्था संगणकीकरणात राज्यात आणि देशात प्रथम क्रमांकावर : भवानी शंकर
October 27, 2026
सावंतवाडी नगरपालिकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी काँग्रेस करणार
October 27, 2026
बांदा येथे ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धेचे आयोजन
October 27, 2026
वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त
October 27, 2026