LIVE UPDATES

सावंतवाडी नगरपालिकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी काँग्रेस करणार

जिल्हाधिकारी आणि नगरविकास खात्याकडे निवेदन देणार : ॲड. समीर वंजारी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 27, 2026 04:05 PM
views 55  views

सावंतवाडी : उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरावडेकर यांनी विशेष सभेबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये  ज्या पद्धतीने विविध मुद्दे मुद्देसूदपणे मांडले, त्यातून प्रत्येक मुद्द्याचे गांभीर्य स्पष्ट होते. नगरपालिकेत एकापाठोपाठ एक कथित गैरव्यवहाराचे विषय समोर येत असतील तर नगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि नगराध्यक्षाच्या नेतृत्वाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. यामुळे कॉग्रेसच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व नगरविकास खात्याकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड समीर वंजारी यांनी सांगितले.

ते म्हणाले, जनतेने भरलेल्या कराच्या पैशांचा योग्य विनियोग होत नसेल तर हा जनतेच्या पैशांचा अपव्यय ठरत नाही का ? सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधीच असमाधान व्यक्त करत असतील तर प्रशासनात सर्व काही आलबेल आहे का ? विशेष सभेत ज्या जबाबदार व्यक्तींची  उपस्थिती अनिवार्य होती‌ व त्यांचे ऑडिट विषयी स्पष्टीकरण महत्त्वाचे होते. त्यांचीच अनुपस्थिती असेल, तर या सभेच्या उद्देशावर प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. संबंधित व्यक्तींच्या अनुपस्थितीमागे नेमके काय कारण होते ? याचेही स्पष्टीकरण जनतेला मिळाले पाहिजे.

सत्ताधारी लोकप्रतिनिधीच जर नगरपालिकेतील कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत असतील, तर या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नगराध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून, उपस्थित प्रश्नांचे समाधानकारक निराकरण होईपर्यंत संबंधित वादग्रस्त कामकाजाबाबत घाईने निर्णय घेऊ नयेत. या संपूर्ण प्रकरणावर नेहमी आक्रमक असलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून आमदार दीपक केसरकर यांनी समोपचारीची भूमिका घेण्यास बजाविले का किंवा भाग पडले का ? परब यांनी त्यावेळच्या अनेक पत्रकार परिषदेमध्ये या विषयावर आपल्याकडे अनेक पुरावे आहेत व त्यांची नावे लवकरच जनतेसमोर आणीन असे सांगितले होते. त्यामुळे जनतेच्या पैशांशी आणि नगरपालिकेच्या कारभाराशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक आहे.

काँग्रेस पक्ष या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहत असून, लवकरच जिल्हाधिकारी आणि नगरविकास खात्याकडे सविस्तर निवेदन सादर करून संबंधित प्रकरणांची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहे. जनतेच्या पैशांचा विनियोग पारदर्शकपणे झाला पाहिजे आणि जबाबदार व्यक्तींनी जनतेसमोर उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे, हीच काँग्रेस पक्षाची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


ताजी बातमी

View all

Maharashtra Cabinet approves 100 percent funding support for Navi Mumbai Chipi flight service
Maharashtra Cabinet Decision : चिपी विमानसेवेला १०० टक्के निधीचे पाठबळ
October 27, 2026
Maharashtra government decision on supernumerary posts for 14,747 eligible NHM contractual health workers
राज्यातील १४ हजार ७४७ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
October 27, 2026
सिंधुदुर्ग जिल्हा संस्था संगणकीकरणात राज्यात आणि देशात प्रथम क्रमांकावर : भवानी शंकर
October 27, 2026
Sindhudurg Local Crime Branch arrests absconding suspect in Pune in Kudal crime case
Kudal Crime News : कुडाळमधील गुन्ह्यातील फरार संशयिताला पुण्यातून घेतले ताब्यात
October 27, 2026
संबंधित बातम्या

View all

सिंधुदुर्ग जिल्हा संस्था संगणकीकरणात राज्यात आणि देशात प्रथम क्रमांकावर : भवानी शंकर
October 27, 2026
बांद्यात दिवाळीनिमित्त डबलबारीचा जंगी सामना, नरकासुर स्पर्धेचेही आयोजन
October 27, 2026
बांदा येथे ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धेचे आयोजन
October 27, 2026
वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त
October 27, 2026