LIVE UPDATES

'मदर क्वीन्स'चं कॅरम स्पर्धेत यश

Edited by: विनायक गांवस
Published on: August 21, 2025 16:06 PM
views 243  views

सावंतवाडी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तर्फे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत सिंधुदुर्ग  जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या पाच विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

 १७ वर्षे खालील वयोगट मुली यामध्ये तनिष्का पडवळ हिने तृतीय क्रमांक पटकावला तर १७ वर्षे खालील वयोगट मुले यामध्ये सुबोध नाईक याने पाचवा क्रमांक संपादित केला. १४ वर्षे खालील वयोगट मुली यामध्ये सौम्या हरमलकर ही द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. तर महिमा गवंडर हिने चतुर्थ क्रमांक पटकावला. तसेच १४ वर्षे खालील वयोगट मुले यामध्ये मंथन पास्ते याने पाचवा क्रमांक पटकावला.या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब  खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे  भोंसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई, मंडळाचे सहाय्यक संचालक ॲडव्होकेट  शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत व  डॉ.सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे क्रीडा शिक्षक भूषण परब, अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.