LIVE UPDATES

थ्रो बॉल स्पर्धेत मदर क्वीन्स शाळेची उत्कृष्ट कामगिरी

Edited by: विनायक गांवस
Published on: May 02, 2026 15:35 PM
views 186  views

सावंतवाडी : जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेत सि. जि. शि. प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या संघांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. 14 वर्षांखालील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला तर 14 वर्षांखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रिडा शिक्षक भूषण परब यांनी अनमोल मार्गदर्शन केले.

 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब  खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे  भोंसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई, मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ.सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.