
वेंगुर्ले : तुळस येथे संपन्न झालेल्या तसेच निलेश नागवेकर पुरस्कृत एस.पी.एल मित्र मंडळ आयोजित खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये निधि निलेश कानविंदे तसेच कु.मृणाल राहुल कदम हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे .
त्यांनी या स्पर्धेमध्ये खुल्या गटातून प्रथम क्रमांक मिळवून विजय संपादन केला आहे. यशस्वी विद्यार्थिनींना प्रशालेचे क्रीडा शिक्षक शेरॉन अल्फान्सो व हितेश मालंडकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदाना तसेच पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक या सर्वांमधून अभिनंदन केले जात आहे.














