LIVE UPDATES

..तोच खरा कलावंत!

अंगभूत कौशल्याने सामान्य विषयालाही देखणी कलाकृती बनवतो, तोच खरा कलावंत! त्याग, साधना आणि अखंड मेहनतीतून रंगभूमीवर जिवंत होणाऱ्या कलाकाराच्या अंतरंगाचा वेध घेणारा हा लेख... दशावतार आणि लावणीसारख्या लोककलांमधून समाजप्रबोधन करणाऱ्या संवेदनशील कलावंतांच्या खडतर प्रवासावर प्रकाश टाकणारे एक अभ्यासपूर्ण आणि भावनिक चिंतन!
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 27, 2026 14:03 PM
views 21  views

स्वतःचे कौशल्य, प्रभुत्व आणि  प्रतिभा वापरुन एखाद्या विषयाचे विविध प्रकार सादर करते  ती व्यक्ती म्हणजे कलावंत असे म्हटलं तर काही चुकीच  नाही. चित्रकला, वादनकला, अभिनय कला,मुर्तीकला, लेखन,वास्तु,गायन,शिल्प, नृत्य, अशा विविध कला आहेत. काही वेळा असेही असते की अनुवंशिक   असते.तर काही वेळा एखादी व्यक्ति  आवड म्हणून  कला शिकते. कोणताही वारसा नसताना अंगभूत  कला ही काही जणांकडे असते.काही जण निसर्गाच्या सानिध्यात राहुन  वेगवेगळ्या कला शिकतात. त्याच बरोबर काही लोक नक्कल करतात. तर काही जण प्राणी,पक्षी यांचे आवजही काढतात,ही सुध्दा कलावंताची कला आहे.

चित्रकलेचा विचार केला तर एखादा कलाकार एखादे  चित्र पाहून जसेच्या तसे काढतो. त्या चित्रात तो आपले सर्व कष्ट, मेहनत एकत्र करून ते रेखाटतो. निसर्ग  चित्र  सुध्दा एखादा कलाकार हुबेहुब  काढतो.पण हे सगळ करण्यासाठी त्या कलावंताला अनेक वर्ष मेहनत त्या गोष्टीचा सराव करावा लागतो तेव्हाच  ते चित्र कागदावर  जन्म घेते. आपल्या अंगभूत कौशल्याने आणि कल्पकतेने कोणत्याही सामान्य विषयाला एका सुंदर  कलाकृतीमध्ये करतो तो कलाकारच असतो. आपल्या कोकणातील सुंदर  कला म्हणजेच दशावतार. ही कला आज सर्वत्र  दूर पसरली आहे. पण या कलेचा विचार  केला तर यातील कलावंत  सुध्दा खूप  मेहनत  घेतो. या क्षेत्रातील   कोणत्याही प्रकारच भाषण हे लिखीत स्वरुपात नसत. तर तो कलावंत हा रंगमंचावर स्वतःच्या कल्पकतेतून आपली कला सादर करतो.

या कलेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कलाकार  रंगभूषा ही स्वतःची स्वतः करतात. ही रंगभूषा करणे म्हणजेच स्वतः त्या कलाकाराची एक कलाच असते. त्याचबरोबर वेशभूषा ही ते कलाकार स्वतःच करतात. रात्रभर  जागरण करून आपली कला लोकांसमोर हा कलाकार सादर करतो.आपल्या समोरच्या नवोदित कलाकारांना सांभाळून घेऊन ही आला कलाकार  सादर करतो. ही लोककला कोकणातील  परंपरागत  कला आहे. दशावतार या कलेत देव देवतांची रुप साकारली जातात. कलावंत हा एखाद्या देवाच रुप घेऊन  ते सुंदर  साकारण्याचा मनापासून  करतो. त्या पात्रात स्वतः कलाकार  झोकून  दे पात्र साकारण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी समोरच्या प्रेक्षकांना वाटत की हा खरोखरच आपल्या समोर देव उभा राहिलाय की काय? हा प्रश्न  सहज पडतो. त्यावेळीच प्रेक्षक त्या कलावंतासमोर  नतमस्तक  होतात. (उदा. नितीन  आशयेकर यांची बाळुमामा भूमिका, राधाकृष्ण  नाईक यांची विठ्ठलाची भुमिका, सुधीर  कलिंगण यांची वेडा चंदन भुमिका इ.) तेव्हाच तो कलावंत  समाज मनावर आपले प्रभुत्व  निर्माण  करतो. हाच खरा कलावंत. 

तसेच दशावतार या कलेत स्त्री पात्र हे स्त्री साकार नाही .तर ते पात्र  पुरुष  साकारतो.स्त्री भुमिका हुबेहुब  साकारतो कलावंत. हेच कलावंतच खर कसब असत. ही स्त्री भुमिका साकारण म्हणजेच खरच एक आव्हान  असते. समाजातील  लोक अनेक  आव्हान  पेलून तो कलावंत ती भुमिका करतो. स्त्री सारखं बोलणं, तिचा पेहराव हे तो कलाकार आपल्या कल्पकतेतून  करतो. सलाम त्या कलावंताना. त्याचबरोबर  या नाटकात  नृत्य, गायन, वादन अशा कलांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो.

लावणी सादर करणं ही सुध्दा एक कलाच आहे. आपल्या नृत्याविष्कार  तो कलावंत  एखादी छान  कथा प्रेक्षकांसमोर  मांडतो. परंतु काही ठिकाणी या कलाकारानं  विषयी लोकांच्या मनात वेगळाच दृष्टिकोन  आहे. या कलावंताचे सुध्दा नृत्यकलेवर  खूप  प्रेम  असते. ते कलेतून  समाज प्रबोधन  करतात. कलावंत  जीव ओतून  आपली कला सादर  करतो त्या कलाकाराचा सन्मान केला पाहिजे. कला ही प्रत्येकाने जोपासली पाहिजे. प्रत्येकाच्या अंगात कला ही असते. ती कला आपल्याला माहित  असली पाहिजे. काही संगीत कलाकार  आपल्या संगीताच्या जादूने रागावलेल्या व्यक्तिचा राग शांत  करतात. निसर्गाचे चित्र काढून  समोरच्या व्यक्तिला आनंदीत करतात. समाजातील घटना आनंद, दुःख, भावना हे सार कलावंतच मांडू शकतो. 

कलावंताचे कार्यक्षेत्र  खूप  मोठे आहे. नृत्याविष्कारातून एखादा कलावंत  कथा सादर करतो. अभिनयातून कलाकार पात्र  साकारतो. कलेच्या भाषेला सीमा नाही. ती जगातील  माणसाला जोडण्याचे काम करते. कलावंत  हा समाजात का खरा शिल्पकार आहे. तो मनोरंजन करत नाही तर कलेतून समाज प्रबोधन करतो. उदा. ऐतिहासिक  नाटके ,देशभक्ती गिते, विविध  चित्रपट, यातुन सामाजिक संदेश मिळतो. कलावंत हा संवेदनाशील असतो. तो सुख दुःख आपल्या कल्पकतेतून  मांडतो आणि इतरांच्या ह्रदयात स्थान  निर्माण  करतो.

कलावंताचे जीवन बाहेरून सोपे वाटते पण तसे नसते.त्यामागे त्याची अनेक  वर्षांपासून तपस्या, साधना असते. एक परिपूर्ण कलाकृती तयार  करण्यासाठी त्यांना अनेक वर्ष मेहनत घ्यावी लागते. कलावंत हा खचून  न जाता नवनवीन प्रयोग  सतत करत असतो. समाजात कलावंताचा आदर केला पाहिजे.ज्या समाजात कलावंताचा आदर तो समाज प्रगतशील आणि संवेदनाशील असतो. कलावंत आपली सुख दुःख बाजुला ठेवुन रंगमंचावर एकरूप होऊन  कला सादर  करतो. कलावंताचे जीवन  हे समाजासाठी वरदान  आहे. कलावंत  हा समाजाचा आरसा आहे. योग्य  दिशा समाजाला देणे हे कलावंताचे काम आहे. स्वतः हा झोकून कला सादर करणे ही खरी कला आहे. आपल्या आयुष्यात  येणारी प्रत्येक  व्यक्ती ही कलावंत  असते. आपले आईवडील सुध्दा कलावंत  असता म्हणून  ते संसाराचा रथ चालवते. प्रत्येकानेच  कलावंत  आणि कला यांचा आदर करावा ती आपली नैतिक जबाबदारी आहे.

- प्रगती परांजपे मुजुमदार, केसरी, सावंतवाडी