LIVE UPDATES

'कर्मवीर इदाते महाविद्यालयाची तालुकास्तरीय बुध्दीबळमध्ये बाजी

Edited by: मनोज पवार
Published on: August 09, 2025 20:10 PM
views 303  views

मंडणगड  : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, मंडणगड या ठिकाणी आयोजित  तालुकास्तरीय बुध्दीबळ  स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपदान केले. यामध्ये इयत्ता 1२वी वाणिज्य वर्गातील तनिशा खेरटकर हिने तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत मुलींच्या गटामध्ये प्रथम क्रमांक संपादन केला तर मुलांच्या गटामधून  तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत इयत्ता 12 वी वाणिज्य वर्गातील सूधीर भोसले याने व्दितीय क्रमांक संपादन केला.

तसेच इयत्ता 12 वी वाणिज्य वर्गातील राज घडशी याने पाचवा क्रमांक संपादन केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मंडणगड परिसरातून अभिनंदन होत आहे. वरील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर सुयश प्राप्त केले असून त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर व उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभये यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली क्रीडाशिक्षक प्रा. साई पवार, प्रा. अशोक कंठाळे, प्रा.संजना दिवेकर यांनी विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते, संस्थाध्यक्षा सौ. संपदाताई पारकर, कार्याध्यक्ष श्री.श्रीराम इदाते, कार्यवाह प्रा. सतीश शेठ, सर्व संस्थापदाधिकारी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर,  उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभये क्रीडा विभागप्रमुख प्रा. साई पवार, प्रा. अशोक कंठाळे, प्रा.संजना दिवेकर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.