LIVE UPDATES

India vs Pakistan U19 Asia Cup 2026 Final : अंडर-१९ आशिया कप फायनलमध्ये शनिवारी भारत-पाकिस्तान आमनेसामने

U19 Asia Cup 2026 Final : गुरुवारी झालेल्या अंडर १९ पुरुष आशिया कप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 13, 2026 05:54 PM
views 3889  views
India and Pakistan U19 cricket teams set to face each other in the U19 Asia Cup 2026 final.

नवी दिल्ली : अंडर-१९ आशिया कपमध्ये नवव्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी भारताला या शनिवारी अल अमरात येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात गतविजेत्या पाकिस्तानविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा आर्यवीर सेहवाग आणि ईशान सूद यांसारखे महत्त्वाचे खेळाडू या सामन्यात निर्णायक भूमिका बजावतील.

गुरुवारी झालेल्या अंडर १९ पुरुष आशिया कप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानने भारताचा १५१ धावांनी पराभव करून दुसरे विजेतेपद पटकावले होते. भारतीय संघ आता त्या पराभवाचा तसेच या स्पर्धेच्या साखळी फेरीत पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. त्याचबरोबर, नवव्यांदा ही ट्रॉफी जिंकून आपला विक्रम अधिक भक्कम करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

अंडर-१९ भारताचा संघ

लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, व्ही. के. विनीत, यशवर्धन सिंग चौहान (उपकर्णधार), कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), रजत बघेल (यष्टीरक्षक), व्ही. यशवीर, आर्यन सावसानी, मोहित उलवा, काव्या पटेल, शाविन विनोद, ईशान सूद.

अंडर-१९ पाकिस्तानचा संघ

फरहान युसूफ (कर्णधार), हुजैफा अहसान, उस्मान खान, हयाम खान, हसनैन अब्बास दार, जहांगीर बिलाल, अहमद हुसेन, नकाब शफीक, हमझा जहूर, अब्दुल सुभान, अली रझा, मोहम्मद हुजैफा, मोहम्मद सय्याम, रिझवानुल्ला, अब्दुल कादिर.


ताजी बातमी

View all

Kokansad Diwali magazine 2026 praised by renowned Marathi literary figure Gurudas Pandurkar for its cultural and literary value.
Kokansad Diwali Ank 2026 : साहित्यिक फराळाबरोबरच जिवंत सांस्कृतिक दस्ताऐवज
November 14, 2026
दाभोळे पोखरबाव येथील ३० वर्षीय तरुणाचे अपहरण
November 14, 2026
वरेरी येथे ३८ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू
November 14, 2026
दाभोळे तिठा येथे घराच्या अंगणातून दुचाकी चोरीला
November 14, 2026
संबंधित बातम्या

View all

श्री भगवती हायस्कूल, मुणगेचे क्रीडा स्पर्धेत दमदार यश
November 14, 2026
India Under-19 cricket team celebrates victory against Pakistan in the U19 Asia Cup 2026 final.
IND vs PAK Final : ३३८ धावांचे लक्ष्य अन् शेवटच्या षटकात विजय; भारताने पाकिस्तानकडून हिसकावला अंडर-१९ आशिया कप
November 14, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Amboli Judo Championship : आंबोलीत ज्यूदोचा राज्यस्तरीय महासंग्राम
November 14, 2026
India and New Zealand cricket teams ahead of the fifth and final ODI at Mount Maunganui.
न्यूझीलंडकडून दुसऱ्या मोठ्या पराभवानंतर भारतासमोर एकदिवसीय मालिका जिंकण्याचे आव्हान
November 14, 2026