LIVE UPDATES

श्री भगवती हायस्कूल, मुणगेचे क्रीडा स्पर्धेत दमदार यश

कुस्ती, मैदानी स्पर्धा आणि कॅरममध्ये विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; जिल्हा व विभागीय स्तरावरील स्पर्धांसाठी निवड
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 14, 2026 07:52 PM
views 26  views

देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये कुस्ती, मैदानी स्पर्धा आणि कॅरम या विविध क्रीडाप्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कुस्ती स्पर्धेत यश

कुस्ती स्पर्धेतील १४ वर्षांखालील वयोगटात वृषभ योगेश धुवाळी याने ४८ किलो वजनी गटात तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. रिदिमा गोविंद घाडी हिने ५९ किलो वजनी गटात तालुकास्तरावर प्रथम, तर जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. श्लोक हेमंत धुवाळी याने ३८ किलो वजनी गटात द्वितीय, तर आर्या सचिन कांबळे हिने ४६ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळवला.

१७ वर्षांखालील वयोगटात मेघेश आनंद वळंजू याने ४५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. जय रवींद्र सावंत याने ४८ किलो वजनी गटात द्वितीय, जनार्दन लक्ष्मण पटकारे याने ४५ किलो वजनी गटात तृतीय, तर जय पुरुषोत्तम सावंत याने ७१ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकावला.

मैदानी स्पर्धांमध्येही चमकदार कामगिरी

मैदानी स्पर्धांमध्ये १७ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रांजल ऋषिकेश कामतेकर हिने उंच उडीत तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्या वर्षी तिने या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवण्याची कामगिरी केली. तिने हर्डल्स प्रकारात तृतीय क्रमांकही पटकावला.

लिशा दयानंद तेली हिने लांब उडीत तालुकास्तरावर प्रथम, तर जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. सलग तिसऱ्या वर्षी विभागीय स्पर्धेसाठी पात्र होण्याचा बहुमान तिने मिळवला. तसेच २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील मुलींच्या तीन किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत श्रावणी कृष्णा रुपये हिने द्वितीय क्रमांक मिळवला.

१७ वर्षांखालील मुलांच्या गटात संदेश सुधाकर माळकर याने भालाफेक प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. हर्ष सदाशिव मयेकर याने पाच किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत प्रथम, तर जय रवींद्र सावंत याने द्वितीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

कॅरम स्पर्धेतही यश

तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात आर्यन राणे याने द्वितीय क्रमांक मिळवला. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात किमया कृष्णा मुणगेकर हिने पाचवा, तर १७ वर्षांखालील मुलींच्या गटात शामिका सचिन घाडी हिने पाचवा क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांचीही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांनी विविध क्रीडाप्रकारांत मिळवलेले हे यश त्यांच्या नियमित सराव, जिद्द आणि चिकाटीचे फलित आहे. सहभागी विद्यार्थ्यांना प्रशाळेचे सहाय्यक शिक्षक हरिदास महाले आणि प्रसाद बागवे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच रश्मी कुमठेकर, गौरी तवटे, सुविधा बोरकर, मनोज मुणगेकर, नामदेव बागवे आणि स्वप्नील कांदळगावकर यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका मोनिका कुंज आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.


ताजी बातमी

View all

Kokansad Diwali magazine 2026 praised by renowned Marathi literary figure Gurudas Pandurkar for its cultural and literary value.
Kokansad Diwali Ank 2026 : साहित्यिक फराळाबरोबरच जिवंत सांस्कृतिक दस्ताऐवज
November 14, 2026
दाभोळे पोखरबाव येथील ३० वर्षीय तरुणाचे अपहरण
November 14, 2026
वरेरी येथे ३८ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू
November 14, 2026
दाभोळे तिठा येथे घराच्या अंगणातून दुचाकी चोरीला
November 14, 2026
संबंधित बातम्या

View all

India Under-19 cricket team celebrates victory against Pakistan in the U19 Asia Cup 2026 final.
IND vs PAK Final : ३३८ धावांचे लक्ष्य अन् शेवटच्या षटकात विजय; भारताने पाकिस्तानकडून हिसकावला अंडर-१९ आशिया कप
November 14, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Amboli Judo Championship : आंबोलीत ज्यूदोचा राज्यस्तरीय महासंग्राम
November 14, 2026
India and New Zealand cricket teams ahead of the fifth and final ODI at Mount Maunganui.
न्यूझीलंडकडून दुसऱ्या मोठ्या पराभवानंतर भारतासमोर एकदिवसीय मालिका जिंकण्याचे आव्हान
November 14, 2026
India cricket team squad update as Kuldeep Yadav is replaced by Gurnoor Brar for the New Zealand Test series 2026.
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात मोठा बदल, कुलदीप यादवच्या जागी 'या' खेळाडूला संधी
November 14, 2026