LIVE UPDATES

Fraud case : प्रीती राणेचा जामीन अर्ज ठाणे सेशन कोर्टाने फेटाळला

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 08, 2026 18:37 PM
views 190  views

ठाणे : ठाणे येथे चर्चेत असलेल्या १८५ कोटी रुपयांहून अधिकच्या कथित गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी आजच्या सुनावणीत प्रीती सचिन राणे यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर ठाणे सेशन कोर्टात आदेश झाला. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

गुंतवणूकदारांच्या प्रश्नांना केवळ न्यायालयीन पातळीवरच नव्हे, तर संबंधित तपास यंत्रणा आणि नियामक संस्थांपर्यंत नेण्यासाठी ॲड. राजेश काकड यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

याच कायदेशीर पाठपुराव्याचा एक भाग म्हणून गुंतवणूकदारांच्यावतीने सेबी कडेही तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्याची दखल घेत सेबीने या कथित अनोंदणीकृत कलेक्टीव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम संदर्भात माहिती मागवली असल्याचेही वृत्त समोर येत आहे. या प्रकरणात सुमारे १,२४६ गुंतवणूकदारांचा उल्लेख तपासातील वृत्तांत करण्यात आला आहे.