
देवगड : मुळ हिंदळे-भंडारवाडा येथील रजत रामचंद्र हिर्लेकर (वय ५३) यांनी आपल्या राहत्या घरी मंगळवारी दुपारच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले. प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी प्रथम मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात, त्यानंतर देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कणकवली येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
उपलब्ध माहितीनुसार, रजत हिर्लेकर यांचा कणकवली येथे टेलरिंगचा व्यवसाय होता. कामानिमित्त ते कणकवली येथे वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी त्या मुळ हिंदळे-भंडारवाडा येथील आपल्या घरी आल्या होत्या. मंगळवारी दुपारी त्यांनी घरात विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तातडीने मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने कणकवली येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची प्राथमिक माहिती कणकवली व देवगड पोलिसांना मृत महिलेच्या नातेवाईकांकडून देण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू होती.
रजत हिर्लेकर यांचे माहेर सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथे आहे. कणकवली येथे त्या गेली अनेक वर्षे टेलरिंगचा व्यवसाय करीत होत्या. सणासुदीच्या काळात त्या मुळ गावी हिंदळे-भंडारवाडा येथे येत असत. त्यांच्या पश्चात आई-वडील, पती, एक मुलगा, एक मुलगी तसेच तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.











