बांद्यात खासदार नारायण राणे चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

Edited by: विनायक गांवस
Published on: April 08, 2026 21:48 PM
views 51  views

सावंतवाडी : खासदार नारायण राणे चषक बांदा या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते व जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सभापती सुस्मिता जाधव, महिला आघाडी अध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक , मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंच्यायत सदस्य जावेद खतीब, बाळू सावंत, गुरू सावंत, राजन रेडकर आदी उपस्थित होते