सोनुर्लीत 'मैत्री चषक २०२६'

Edited by: विनायक गांवस
Published on: March 18, 2026 17:40 PM
views 17  views

सावंतवाडी : सोनुर्ली येथील माऊली कला क्रीडा मंडळ, देऊळवाडी यांच्या वतीने 'मैत्री चषक २०२६' या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा क्रिकेटचा महासंग्राम येत्या २१ आणि २२ मार्च २०२६ रोजी सोनुर्ली येथील माऊली क्रीडांगणावर रंगणार आहे.

     

या स्पर्धेतील विजेत्या संघांसाठी मंडळाने भरघोस पारितोषिके जाहीर केली आहेत. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघास २२,२२२ रुपये, तर द्वितीय क्रमांकाच्या संघास १५,५५५ रुपये रोख आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या मुख्य पारितोषिकांशिवाय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी इतर अनेक आकर्षक बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहेत. माऊली कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी क्रीडा शौकिनांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.