कुडाळ : खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे जिल्हास्तरीय ‘सुपर सिक्स चॅलेंजर’ कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा गुरुवार, दि. १० एप्रिल २०२६ रोजी महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे पार पडणार आहे.
सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन आणि भारतीय जनता पार्टी, कुडाळ तालुका यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २०२६-२७ हंगामातील ही पहिली स्पर्धा असल्याने खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूने १०० रुपये नोंदणी शुल्क असोसिएशनकडे जमा करणे आवश्यक आहे. सर्व खेळाडूंची प्रवेश फी आयोजकांकडून भरली जाणार असून सहभागी खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच सकाळी नाश्ता व चहा, तर संध्याकाळी स्नॅक्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
स्पर्धेत पहिल्या आठ क्रमांकांतील विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जाणार असून ‘व्हाईट स्लॅम’ व ‘ब्लॅक स्लॅम’साठी विशेष आकर्षक बक्षिसांचीही तरतूद आहे.
स्पर्धा ‘ओपन ग्रुप’मध्ये खेळविण्यात येणार असून पहिल्या फेरीपासूनच ६ बोर्डांचे ३ गेम खेळवले जाणार आहेत. यंदा ‘सुपर सिक्स चॅलेंजर’साठी काही विशेष नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार, सामन्यांचे स्वरूप ८ ऐवजी ६ बोर्डांचे असेल, सिंगल पीस डिफेन्सला परवानगी नसेल, तसेच खेळातील काही तांत्रिक बदल लागू करण्यात आले आहेत. टाय झाल्यास टायब्रेकर आणि सडन डेथचा वापर केला जाणार आहे.
स्पर्धेसाठी नावे नोंदविण्याची अंतिम तारीख ७ एप्रिल २०२६ असून सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली, देवगड आणि मालवण येथे नोंदणी केंद्रे उपलब्ध आहेत.
खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव व लोगो असलेला पांढरा टी-शर्ट आणि फुल पॅन्ट परिधान करणे अनिवार्य आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अवधूत भणगे तसेच भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष श्री. संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
नोंदणी केंद्रे
📍 सावंतवाडी – राजेश निर्गुण (7517535028)
📍 कुडाळ – शुक्राचार्य म्हाडेश्वर (9421238518)
📍 वेंगुर्ला – ओंकार कुबल (7276523372)
📍 कणकवली – अनिल कम्मार (9370588308)
📍 देवगड – प्रकाश प्रभू (9423303822)
📍 मालवण – संतोष बनसोडे (9423302707)