
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला आणि खेळाडूंना नवी दिशा देण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. येत्या १८ जून ते २० जून २०२६ या कालावधीत कुडाळ येथील 'संत राऊळ महाराज बॅडमिंटन अकादमी' येथे 'जिल्हा पंच निवड चाचणी' चे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीचे भव्य उद्घाटन १८ जून रोजी अकादमीच्या आवारात संपन्न होणार आहे.
या आयोजनाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. तसेच, नवीन खेळाडूंना पंच परीक्षेमध्ये प्राधान्य देऊन, भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दर्जेदार आणि कुशल बॅडमिंटन पंच तयार करणे, हे या चाचणीचे मुख्य उद्दिष्ट आहे. या पंच निवड चाचणीसाठी राष्ट्रीय सामना नियंत्रक संदीप हेबळे आणि राष्ट्रीय पंच राजपूत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उपस्थित प्रशिक्षणार्थी व खेळाडूंना या दोन्ही राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचे बहुमोल मार्गदर्शन व अनुभव शिकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. चाचणीचा कालावधी १८ जून ते २० जून २०२६ असून संत राऊळ महाराज बॅडमिंटन अकादमी, कुडाळ येथे होणार आहे. या नोंदणीसाठी शुल्क: रुपये ५००/- मात्र आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी या चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क या पंच परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी राज चव्हाण (९४०५८०९००१) किंवा समद शेख (७७७५८०८२९५) यांच्याशी संपर्क साधावा.














