LIVE UPDATES

शिरवलमध्ये १५ एप्रिलपासून क्रिकेट स्पर्धा

संदीप चौकेकर व प्रवीण तांबे मित्रमंडळातर्फे आयोजन
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 03, 2026 15:20 PM
views 308  views

कणकवली : संदीप चौकेकर मित्रमंडळ व प्रवीण तांबे मित्रमंडळ, शिरवल यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १९ एप्रिल या कालावधीत शिरवल येथे एक गाव एक संघ स्वरुपाची ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, द्वितीय ५१ हजार, उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी १५ हजार रुपये व चषक अशी बक्षिसे आहेत.

उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकसाठी प्रत्येकी २ हजार ५०० रुपये व चषक, मालिकावीरसाठी ५ हजार रुपये व चषक अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षिसे आहेत. प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या १६ संघांना प्रवेश दिला जाणार असून ८ एप्रिलपर्यंत संघनोंदणी अनिवार्य आहे. स्पर्धा लीग पद्धतीची असून ४ गटांमध्ये खेळवली जाणार आहे. प्रत्येक गटांमधूनन विजयी झालेला संघ सेमीफायनल साठी प्राप्त ठरणार आहे. अधिक माहितीसाठी प्रवीण तांबे, संदेश तांबे, अविनाश कदम, अनिप सावंत यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.