देऊळवाडा येथे आजपासून क्रिकेट स्पर्धा

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: March 19, 2026 12:25 PM
views 65  views

मालवण : संजय स्मृती देऊळवाडा बाळगोपाळ मित्रमंडळ, मालवण यांच्यावतीने भव्य दिव्य नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 'देऊळवाडा प्रीमियर लीग' दि. १९ व २० मार्च रोजी शांतिसागर मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे.


विजेत्या संघाला १०,००० रुपयांचे पारितोषिक व आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला ६,००० रुपयांचे द्वितीय पारितोषिक व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यातील सामनावीरास आकर्षक भेटवस्तू तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांनाही विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.