LIVE UPDATES

भोसले इन्स्टिट्यूटच्या टेबल टेनिस - बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात

Edited by: विनायक गांवस
Published on: February 13, 2026 17:14 PM
views 194  views

सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये कोल्हापूर विभागीय तंत्रनिकेतन संस्थांकरिता आयोजित बी-वन झोन टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील एकूण अकरा संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन उपप्राचार्य गजानन भोसले यांच्या हस्ते झाले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.


टेबल टेनिसमध्ये यजमान यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संघाने विजेतेपद पटकावले. कोल्हापूर येथील बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी संघ उपविजयी ठरला. बॅडमिंटन मध्ये डी.वाय.पाटील पॉलिटेक्निक, कोल्हापूर विजयी तर संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे उपविजयी ठरले. बक्षीस वितरण समारंभ भोसले नॉलेज सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ले.कर्नल रत्नेश सिन्हा यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कॉलेजचे स्पोर्ट्स कॉर्डिनेटर श्रीधर मयेकर व केशव मणेरीकर यांनी मेहनत घेतली.