LIVE UPDATES

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत बॅ.नाथ पै स्कूलचे यश

चार खेळाडूंची महाराष्ट्र बॅडमिंटन अजिक्यपद स्पर्धेसाठी निवड
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 26, 2025 11:29 AM
views 244  views

कुडाळ : कुडाळ इथं नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूलच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. प्रशालेचे विद्यार्थिनी नीरजा राजेश पवार हीने चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.तिची उत्कुष्ट खेळाडू म्हणून निवड झाली आहे.    

नीरजा राजेश पवार हिने  ९ वर्षांखालील गटात सुवर्णपदक पटकावले, तर ११ वर्षांखालील गटात रौप्यपदकावर आपले नाव कोरले. या अप्रतिम कामगिरीबद्दल तिला उत्कृष्ट खेळाडू  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ११ वर्षाखालील गटात स्वरा योगेश कोळी  हिने नीरजा पवार हिला मात देत जिल्हा अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.

सिंधुदुर्ग जिल्हा निवड बॅडमिंटन स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी सादर करत इयत्ता दुसरीतील विद्यार्थी विघ्नेश वैभव घोगळे याने अंतिम सामन्यात बाजी मारली. त्याने अंतिम सामन्यात प्रतिस्पर्ध्याचा 21/16, 21/11 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत महाराष्ट्र बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. तर याच शाळेचा इ. २ री चा खेळाडू देवांश योगेश कोळी याला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

प्रशालेच्या या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रशालेचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक रोहिदास राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.  तसेच या त्यांच्या यशाबद्दल सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर, संस्था चेअरमन  उमेश गाळवणकर यांनी त्यांचे व त्यांच्या पालकांचे, क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांच्याही या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे  अभिनंदन होत आहे. या यशाने बॅडमिंटन क्षेत्रात त्यांचे उज्ज्वल भविष्य असल्याचे संकेत दिले आहेत.