अवनी परबने नॅशनल कराटे स्पर्धेत पटकाविले सिल्व्हर मेडल

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 29, 2025 20:04 PM
views 20  views

सिंधुदुर्गनगरी : दुबई येथे पार पडलेल्या नॅशनल कराटे  चॅम्पियनशिप मध्ये  ठाणे शहराची अवनी अमोल परब हिने सिल्वर मेडल पटकावलं भारताचे तसेच महाराष्ट्राचे व आपल्या ओरोस गावचे हे नाव उज्वल केले ति आपल्या ओरोस गावी आली असता तिच्या घरी जाऊन सिंधुदुर्ग परब मराठा समाज बांधवांच्या वतीने तिचे पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन स्वागत करण्यात आले.  

ओरोस येथील रहिवासी मारुती परब पिग्मी एजंट यांची अवनी परब ही नात आहे. नोकरी-कामानिमित्त अमोल परब हे  कुटुंब - ठाणेला नोकरी -व्यवसाय करण्यासाठी राहत आहे. अवनी परब हिचे शिक्षण व क्रीडा- प्रशिक्षण ठाणे येथेच सुरू आहे. तिने आता पर्यंत  कराटू खेळात सहभागी होऊन अनेक बक्षीस, मेडल मिळविली आहेत. तसेच अन्य राज्यात जाऊन मोठ-मोठी मेडल्स मिळविले आहेत. कराटेचे शिक्षण घेत असताना तिची निवड नॅशनल कराटे या स्पर्धेमध्ये झाली.व ती ठाणे येथून कराटे स्पर्धेत भाग घेऊन दुबई या शहरांमध्ये  कराटे खेळात सहभागी होत सिल्वर मेडल पदक मिळवून महाराष्ट्राचे व देशाचे नाव उज्वल केले आहे. तिने गोवा येथे ही ब्रॉन्झ मेडल  पटकावीत आपल्या महाराष्ट्राचे व गावाचे नाव उज्वल केले आहे. तिचे सर्वच स्तरावरून कौतुक केले जात आहे.

अवनी परब ही नेहमी सुट्टी मध्ये आपल्या गावी ओरोस येथे कुटुंबातील सदस्यांबरोबर गणपती उत्सव व मे महिन्यात येऊन सुट्टीचा आनंद घेत असते. अवनी व तिचा भाऊ फुटबॉल खेळाडू असून या दोघांना आजोबा मारुती परब हे नेहमी खेळांसाठी प्रोत्साहन देत आहेत. बाहेरील राज्यात जाताना ती आजोबांना सोबत घेऊन जाते.

ओरोस येथील अवनी अमोल परब यांच्या मुलीने दुबई येथे नॅशनल कराटे स्पर्धेत भाग घेत सिल्वर मेडल पदक मिळवून देशाचे व महाराष्ट्राचे नाव उज्वल केले. अवनी परब गावी आली असता तिचे सिंधुदुर्ग परब मराठा समाज बांधवांच्या वतीने पुष्पगुच्छ भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुशील परब, आर एल परब, बाळकृष्ण परब, महादेव परब, विनोद परब, ओम परब,मारुती परब, अमोल परब,व अवनीचे आई- बाबा,आजी व भाऊ आदी उपस्थित होते.