LIVE UPDATES

India Women’s Hockey Team : ४४ वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकून भारतीय महिला हॉकी संघाने घडवला इतिहास

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 02, 2026 19:19 PM
views 67  views
Indian women’s hockey team celebrates gold medal victory at Asian Games 2026

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकीच्या अंतिम सामन्यात चीनचा पराभव करून भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकले. तब्बल ४४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघाने हे सुवर्णपदक पटकावले. या विजयामुळे भारतीय महिला हॉकी संघाने २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठीही पात्रता मिळवली.

अंतिम सामन्यात भारताने चीनचा १-० असा पराभव केला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या चीनविरुद्ध, भारताने दहाव्या मिनिटाला लालरेम्सियामीच्या गोलद्वारे आघाडी घेतली आणि ती आघाडी सामन्याच्या अखेरपर्यंत कायम राखली.

आपला २०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या लालरेम्सियामीने उजव्या बाजूला चेंडू मिळाल्यावर तो थेट गोलमध्ये धाडला. दुसऱ्या सत्रात (क्वार्टरमध्ये), गोलरक्षक सविताने आपल्या डाव्या बाजूला झेप घेत चीनचा पेनल्टी स्ट्रोक रोखून धरला. चीनला रौप्यपदक मिळाले, तर जपानने शूटआउटमध्ये कोरियाचा पराभव करून कांस्यपदक जिंकले.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचा सुवर्णपदकापर्यंतचा प्रवास

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी उझबेकिस्तानवर १९-० असा विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी इंडोनेशियाचा १७-१ आणि थायलंडचा २०-१ असा पराभव केला.

'पूल बी' मधील सिंगापूरविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात भारताने ७-० असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. बुधवारी दक्षिण कोरियाचा २-० असा पराभव करून भारतीय महिला हॉकी संघाने आठ वर्षांच्या खंडानंतर अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम सामन्यात भारताने चीनचा १-० असा पराभव केला.

भारतीय महिला हॉकी संघाने गतविजेत्या चीनचा १-० असा पराभव करून ४४ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि त्याद्वारे २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. या विजयाचे श्रेय भारतीय बचाव फळीला (डिफेन्सला) जाते.

चीनच्या सततच्या आक्रमणांनंतरही त्यांनी संयम राखला आणि मिळालेली एक गोलची आघाडी सामन्याच्या अखेरपर्यंत टिकवून ठेवली. लालरेमसियामीने १० व्या मिनिटाला भारताला आघाडी मिळवून दिली आणि २४ व्या मिनिटाला भारताची सर्वात अनुभवी खेळाडू सविताने पेनल्टी स्ट्रोक रोखून चीनला गोल करण्यापासून रोखले. यापूर्वी, भारतीय महिला हॉकी संघाने १९८२ च्या दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.  त्या स्पर्धेत महिला हॉकीचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला होता.