
नवी दिल्ली : पावसाचा व्यत्यय आणि ओल्या मैदानामुळे उपांत्यपूर्व फेरीचे सामने रद्द झाल्याने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटच्या उपांत्य फेरीचे वेळापत्रक अधिकृतपणे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिला उपांत्य सामना गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी निशिन येथे खेळवला जाईल. हा सामना सकाळी ५:३० वाजता सुरू होणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा उपांत्य सामना सकाळी १० वाजता सुरु होईल. कांस्य पदकासाठीचा सामना ३ ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांमध्ये सकाळी ५:३० वाजता सुरुवात होईल.
सुवर्ण पदकासाठीचा सामना ३ ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीत विजयी झालेल्या संघांमध्ये सकाळी १० वाजता खेळवला जाईल. या वेळा 'भारतीय प्रमाण वेळे'नुसार आहेत
आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटचे चारही उपांत्यपूर्व सामने रद्द करण्यात आले. यापैकी कोणत्याही सामन्यासाठी नाणेफेकही होऊ शकली नाही. त्यामुळे हे संघ आता कोणताही सामना न खेळता थेट उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.














