LIVE UPDATES

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या सोहम देशमुखचा डंका

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 28, 2026 19:27 PM
views 20  views

सावंतवाडी : कणकवली येथील समर्थ कार्यालय हॉलमध्ये जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १७ वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा इयत्ता ८ वीतील कु. सोहम देशमुख व कु. शौर्य चव्हाण यांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेत बुद्धिबळ खेळाचे एकूण सहा राऊंड घेण्यात आले. त्यापैकी कु. शौर्य चव्हाण याने स्पर्धेत तीन पॉईंट प्राप्त केले, तर कु. सोहम देशमुख याने उत्कृष्ट कामगिरी करत साडेचार पॉईंट प्राप्त केले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर प्रशालेतील कु. सोहम देशमुख याची पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

कु. सोहम देशमुख याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी झालेली निवड ही स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे संचालक रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका प्राची साळगावकर, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी कु. सोहम देशमुख व कु. शौर्य चव्हाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.