LIVE UPDATES

BCB D3 trophy : बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून ‘डोमेस्टिक 3’ ट्रॉफीची घोषणा, सहा फ्रँचायझींचा सहभाग

BCB franchise-based domestic competition : डी 3 ट्रॉफीसाठी 'आयकॉन' खेळाडूंचीही घोषणा करण्यात आली आहे. डी 3 ट्रॉफीची सुरुवात या वर्षी १५ डिसेंबरपासून टी-२० स्पर्धेने होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी सहा कंपन्यांनी फ्रँचायझी विकत घेतल्या आहेत. बीसीबी प्रत्येक फ्रँचायझीसोबत तीन वर्षांचा करार करेल. प्रत्येक हंगामात संघ फर्स्ट-क्लास, लिस्ट 'ए' आणि टी-२० अशा तीन स्पर्धांमध्ये भाग घेतील.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 28, 2026 13:09 PM
views 58  views
Bangladesh Cricket Board launches franchise-based Domestic 3 Trophy featuring three cricket formats

नवी दिल्ली : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने एका अनोख्या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात केली आहे. या स्पर्धेचे नाव 'डोमेस्टिक ३' ट्रॉफी असे असून ही स्पर्धा २०२६-२७ च्या देशांतर्गत हंगामात सुरू होणार आहे. या स्पर्धेत फर्स्ट-क्लास, लिस्ट 'ए' आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमधील सामने खेळले जातील. या स्पर्धेबाबतची घोषणा बीसीबीने रविवारी, २७ सप्टेंबर रोजी केली. 

डी 3 ट्रॉफीसाठी 'आयकॉन' खेळाडूंचीही घोषणा करण्यात आली आहे. डी 3 ट्रॉफीची सुरुवात या वर्षी १५ डिसेंबरपासून टी-२० स्पर्धेने होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी सहा कंपन्यांनी फ्रँचायझी विकत घेतल्या आहेत. बीसीबी प्रत्येक फ्रँचायझीसोबत तीन वर्षांचा करार करेल. प्रत्येक हंगामात संघ फर्स्ट-क्लास, लिस्ट 'ए' आणि टी-२० अशा तीन स्पर्धांमध्ये भाग घेतील. 

टी-२० स्पर्धेनंतर फर्स्ट-क्लास क्रिकेट आणि त्यानंतर एकदिवसीय स्पर्धा खेळवली जाईल. यात फर्स्ट-क्लास क्रिकेट जानेवारीत आणि एकदिवसीय क्रिकेट मे महिन्यात सुरू होईल. संघ व्यवस्थापनाची निवड करण्यासाठी बीसीबी या आठवड्याच्या शेवटी एक 'ड्राफ्ट' आयोजित करेल. यामुळे फ्रँचायझींना स्पर्धेसाठी त्यांच्या पसंतीच्या प्रशिक्षकांसाठी बोली लावता येईल. 

सहा फ्रँचायझींसाठी 'आयकॉन खेळाडू' म्हणून तौहिद हृदोय (फॉर्च्युन ग्रुप), मोहम्मद नईम (सिटिझन्स बँक), मेहदी हसन मिराज (वॉल्टन), नुरुल हसन (एसीई ब्लू स्टार), मुशफिकुर रहीम (सेव्हन रिंग्ज सिमेंट), मोसाद्देक हुसेन (अकमी लॅबोरेटरीज) काम पाहणार आहेत. याबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जाहीर केले. प्रत्येक संघाला तिन्ही प्रकारांसाठी एकूण २३ क्रिकेटपटूंची निवड करावी लागेल. 'डी 3' स्पर्धेमध्ये बांगलादेश क्रिकेट लीगच्या 'फर्स्ट-क्लास' आणि 'लिस्ट-ए' स्पर्धांचा, तसेच 'एनसीएल टी 20' स्पर्धांचा समावेश असेल.