क्रीडा वृत्त : भारतीय क्रिकेटमधून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाशी संबंधित आहे. बीसीसीआयला आता नवीन अध्यक्ष मिळणार आहे. सध्या बीसीसीआयचे अध्यक्षपद सौरव गांगुली भूषवत आहे. मात्र, त्याच्या अध्यक्षपदाचे आता काही दिवसच शिल्लक राहिले आहे. लवकरच बीसीसीआयच्या सर्व पदांसाठी पुन्हा निवडणूक होणार आहे. मात्र, गांगुली पुन्हा या पदाचा दावेदार नसल्याची माहिती आहे. अशात बीसीसीआयचा नवीन अध्यक्ष कोण असेल, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असताना एकाचे नाव निश्चित झाले आहे.
यासाठी दोन नावे पुढे येत असताना टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, भारताचे माजी क्रिकेटपटू आणि विश्वचषक विजेता रॉजर बिन्नी (Roger Binny) हे बीसीसीआयचे अध्यक्ष होऊ शकतात. बिन्नी हे सध्या कर्नाटक क्रिकेट असोसिएशनमध्ये आहेत. तसेच ते भारताच्या निवडसमितीचेही सदस्य राहिले आहेत. तसेच माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा अध्यक्ष बनण्याच्या मूडमध्ये नाहीये. तसेच, सचिव जय शाहदेखील अध्यक्ष बनण्याच्या शर्यतीत नाहीयेत. मात्र, ते सचिव पदासाठी पुन्हा अर्ज करत आहेत.
येत्या 18 ऑक्टोबरला मिळणार बीसीसीआयला नवीन अध्यक्ष
बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही निवडणूक मुंबईत होणार आहे. यापूर्वी 11 आणि 12 ऑक्टोबरला दावेदार आपले नामांकन जमा करतील. त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी नामांकन पत्रांची तपासणी होईल. 14 ऑक्टोबरपर्यंत नावे परत घेता येऊ शकतील. तसेच, 15 ऑक्टोबरला नामांकन देणाऱ्यांची यादी जारी केली जाईल. त्यानंतर जर दोनपेक्षा जास्त दावेदार असतील, तर 18 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा अध्यक्ष बनण्याच्या मूडमध्ये नाहीये. तसेच, सचिव जय शाहदेखील अध्यक्ष बनण्याच्या शर्यतीत नाहीयेत. मात्र, ते पुन्हा सचिव पदासाठी पुन्हा अर्ज करत आहेत. अशातच अध्यक्ष पदासाठी जो दावेदार आहे, त्यामध्ये बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि भारतीय संघाचे माजी खेळाडू रॉजर बिन्नी यांची नावे समोर येत आहेत. असे म्हटले जात आहे की, याबाबत बैठकाही झाल्या आहेत, ज्यामध्ये बीसीसीआयचे अनेक दिग्गज सामील झाले होते.
गांगुलीने 2019मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपद स्विकारले. तसेच त्याची भविष्याबाबत काय विचार आहेत हे स्पष्ट झाले नसून काही रिपोर्ट्सनुसार, तो आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार अशा चर्चांना उधान आले आहे.
गांगुली मुंबईमध्ये असून बिन्नी हे पण सोमवारी मुंबईत पोहोचले आहेत. तसेच जय शाह, अरुण सिंह धूमल, राजीव शुकला आणि रोहन जेटली यांनाही नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे.