कान्होजी आंग्रे जलतरणातील 110 स्पर्धकांनी केली विजयदुर्ग खाडी पार

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 28, 2026 12:08 PM
views 44  views

देवगड : महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक, उडीसा येथील कान्होजी आंग्रे जलतरण स्पर्धेतील ११० स्पर्धकांनी केली विजयदुर्ग खाडी पार केली. श्री दुर्गामाता कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ विजयदुर्ग यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेच्या या ठिकाण ची ही ९ वी सरखेल कान्होजी आंग्रे विजयदुर्ग खाडीतील खुली जलतरण स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेचे नियोजन जिम स्विमिंग अकॅडमी कोल्हापूर यांनी केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रासह, कर्नाटक व गोवा राज्यातील ११० जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांनी स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धेचे उद्घाटन राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने यांनी केले. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ उस्मानाबाद जलतरणचे श्रीयुत पांडुरंग रणखांब ठाण्याचे ॲड मोरे , कोल्हापूर जलतरणचे ॲड प्रवीण भंडारी कपिल मेथे शुभांगी मंगलोरकर तेजस्विनी मेथे श्रीयुत विश्वनाथ घोरपडे सरकार , रविकांत राणे दीपक करंजे प्रदीप साखरकर आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी सात वर्षे वयोगट मुले पाचशे मीटर प्रथम क्रमांक आदेश जाधव, रत्नागिरी द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक निवेश व्हावळ ठाणे, चतुर्थ क्रमांक कियान मेथे तर अवघ्या रत्नागिरीच्या चार वर्षाच्या इजहान कापडे याने स्पर्धा पूर्ण केली सात वर्षाखालील मुली 500 मीटर प्रथम क्रमांक अद्विका गौडा कर्नाटक द्वितीय क्रमांक गाथा दड्डीकर बेळगाव तृतीय क्रमांक शीशा मयूर ठाणे नऊ वर्षाखालील मुले एक किलोमीटर प्रथम क्रमांक हर्षवर्धन कर्लेकर बेळगाव द्वितीय क्रमांक मयंक चव्हाण कोल्हापूर तृतीय क्रमांक सिद्ध मुपीनिट्टी ठाणे चतुर्थ क्रमांक मोहक गौडा कर्नाटका पाचवा क्रमांक गुरुराज पाटील कोल्हापूर नऊ वर्षाखालील मुली एक किलोमीटर प्रथम क्रमांक दूर्वा चव्हाण कोल्हापूर द्वितीय क्रमांक गुणीश्का येल्लाजी बेळगाव अकरा वर्षाखालील मुले एक किलोमीटर प्रथम क्रमांक अर्णव पिळणकर रत्नागिरी द्वितीय क्रमांक स्कंद गाडगे बेळगाव तृतीय क्रमांक कर्णसिंह घोरपडे कोल्हापूर चतुर्थ क्रमांक विहांदळवी रत्नागिरी पाचवा क्रमांक ज्ञानेश गोइलकर कोल्हापूर अकरा वर्षाखालील मुली एक किलोमीटर प्रथम क्रमांक वैष्णवी शिरोडकर गोवा द्वितीय क्रमांक समयरा भोंसले गोवा तृतीय क्रमांक सोयरा मनोलकर बेळगाव चतुर्थी क्रमांक कादंबरी काकडे कोल्हापूर पाचवा क्रमांक प्रणामय्या प्रभू बेळगाव तेरा वर्षाखालील मुले दोन किलोमीटर शौर्या राऊत रत्नागिरी, पुणेत बंग कोल्हापूर अभय तवंदकर कोल्हापूर रंजन कुलकर्णी बेळगाव अर्णव भंडारी कोल्हापूर अकरा वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक कृष्णा हार्व्याशी कोल्हापूर द्वितीय क्रमांक संपिता व्हावळ ठाणे तृतीय क्रमांक धृती कोळी ठाणे, चतुर्थी क्रमांक काव्या मेथे कोल्हापूर पाचवा क्रमांक त्रिधा फणसेकर ठाणे पंधरा वर्षाखालील मुले दोन किलोमीटर प्रथम क्रमांक वरून राज डोंगळे कोल्हापूर द्वितीय क्रमांक विधान धुरी सिंधुदुर्ग तृतीय क्रमांक मेघराज डोंगळे कोल्हापूर चतुर्थ क्रमांक अंजनेय काटकर कोल्हापूर पाचवा क्रमांक आयुष कटाळे रत्नागिरी पंधरा वर्षाखालील मुली तीन किलोमीटर प्रथम क्रमांक राजनंदिनी तिवले कोल्हापूर द्वितीय क्रमांक अनन्या पत्की कोल्हापूर तृतीय क्रमांक निधी भिडे रत्नागिरी चतुर्थ क्रमांक अनुष्का बजाज कोल्हापूर पाचवा क्रमांक मानवी बंग कोल्हापूर 17 वर्षाखालील मुले तीन किलोमीटर प्रथम क्रमांक आदित्य बर्गे द्वितीय क्रमांक पार्थ शेट्टी कर्नाटका तृतीय क्रमांक रुद्र मनाडे कोल्हापूर चतुर्थी क्रमांक आयुष काळे रत्नागिरी पाचवा क्रमांक योगेंद्र तावडे रत्नागिरी 17 वर्षाखालील मुली तीन किलोमीटर प्रथम क्रमांक चैत्राली नवले सातारा द्वितीय क्रमांक सानवी पवार रत्नागिरी तृतीय क्रमांक आरोही पिळणकर रत्नागिरी चतुर्थ क्रमांक प्राजक्ता प्रभू बेळगाव पाचवा क्रमांक वृंदा गोईलकर कोल्हापूर 21 वर्षाखालील मुले पाच किलोमीटर प्रथम क्रमांक भाग्येश पालव सिंधुदुर्ग द्वितीय क्रमांक स्मरण मंगलोरकर बेळगाव तृतीय क्रमांक पुष्कर गवळी कोल्हापूर चतुर्थी क्रमांक आत्मज अकोलकर ठाणे पाचवा क्रमांक रोहित पटेकर ठाणे 21 वर्षाखालील मुली पाच किलोमीटर प्रथम क्रमांक तनया मिलके रत्नागिरी द्वितीय क्रमांक श्रावणी रणखांब धाराशिव 35 वर्षाखालील पुरुष पाच किलोमीटर प्रथम क्रमांक करण मिलके रत्नागिरी द्वितीय क्रमांक अल्फराज कापडे रत्नागिरी 35 वर्षाखालील महिला पाच किलोमीटर प्रथम क्रमांक समिधा मोरे ठाणे द्वितीय क्रमांक गौरी राऊत ठाणे 50 वर्षाखालील पुरुष दोन किलोमीटर प्रथम क्रमांक राजू कलकुटगी कोल्हापूर द्वितीय क्रमांक रमेश बंग कोल्हापूर तृतीय क्रमांक विपुल पवार मुंबई चतुर्थ क्रमांक कोल्हापूर पाचवा क्रमांक महेश पवार धाराशिव 50 वर्षाखालील महिला दोन किलोमीटर प्रथम क्रमांक गौरी मिलके रत्नागिरी द्वितीय क्रमांक रेखा अमयप्पन ठाणे तृतीय क्रमांक असिता पवार पुणे 51 वर्षावरील पुरुष दोन किलोमीटर प्रथम क्रमांक श्रीमंत गायकवाड सातारा द्वितीय क्रमांक अजित पिळणकर रत्नागिरी 51 वर्षावरील महिला प्रथम क्रमांक गायत्री फडके पुणे या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी दुर्गामाता चे पदाधिकारी रविकांत राणे दीपक करंजे जिम स्विम अकॅडमीचे अजय पाठक कोल्हापूर जिल्हा जलतरण संघटनेचे ॲड सुशील पाटील, स्पर्धा निरीक्षक कैलास आखाडे यांच्या उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी विजयदुर्ग बोटिंग चे व तालुका आरोग्य कार्यालय देवगडचे सहकार्य लाभले. पुरळ पंचायत समिती सदस्या सौ संजना अलवे विजयदुर्गचे प्रसाद देवधर यांचे देखील यावेळी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन लाभले.