LIVE UPDATES

सावंतवाडीत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा शैक्षणिक उपक्रम

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि चटईंचे वाटप
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 04, 2026 05:07 PM
views 37  views

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने आरोग्य क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही योगदान देण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील मराठी शाळांना भेट देऊन त्या शाळेमधील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेटवस्तू प्रतिष्ठानचा माध्यमातून दिल्या गेल्या. 

सावंतवाडी शहरातील तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये हा उपक्रम राबवला. सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 5 या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्या बरोबरच बसण्यासाठी चटई देण्यात आल्या. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे, हेलन निबरे यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

यावेळी शाळेतील शिक्षिका संगीता भिरवंडेकर, शुभलता सुखी यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे आभार मानले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे शरदिनी बागवे, हेलन निबरे, उपाध्यक्ष  विजय वाडकर व शाळेच्या शिक्षिका उपस्थित होत्या.


ताजी बातमी

View all

Traditional Konkani poha being prepared at a rice mill in Sindhudurg ahead of Diwali amid reduced paddy production.
Sindhudurg Poha : सिंधुदुर्गात भात उत्पादन घटल्याने गावठी पोहे महागणार
November 04, 2026
US Midterm Election Results 2026 showing Democratic Party victories in the Senate and House, with Donald Trump and Indian-American candidates in the spotlight.
US Midterm Election Results 2026 : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का, डेमोक्रॅट्सला मिळाले बहुमत
November 04, 2026
Mumbai Suburban men's and women's teams celebrate their victories at the Mumbai University Inter-Zonal Kabaddi Championship in Ratnagiri.
मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत मुंबई सबर्बनची महिला, पुरुषांच्या गटात बाजी
November 04, 2026
Ratnagiri athletes Dr Nitin Sangaonkar and Rahul Bhosale successfully complete the Goa Ironman 70.3 Triathlon in 7 hours and 2 minutes.
Goa Ironman 70.3 : गोवा आयर्नमॅन ७०.३ ट्रायथलॉनमध्ये रत्नागिरीच्या दोन शिलेदारांची बाजी
November 04, 2026
संबंधित बातम्या

View all

Traditional Konkani poha being prepared at a rice mill in Sindhudurg ahead of Diwali amid reduced paddy production.
Sindhudurg Poha : सिंधुदुर्गात भात उत्पादन घटल्याने गावठी पोहे महागणार
November 04, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News : जैवविविधतेचे नुकसान करणारे प्रकल्प घातक
November 04, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
घोडेमुख पेंडूरात ८ नोव्हेंबरला डबलबारी भजनाचा सामना
November 04, 2026
Kudli to Chiplun ST bus accident near Ambekarwadi Shir Bhatle in Guhagar
ST Bus Accident : धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने नियंत्रण सुटले अन् घडला अपघात
November 04, 2026