LIVE UPDATES

Upcoming SmartPhones : ऑगस्टमध्ये लॉन्च होणार 'हे' दमदार स्मार्टफोन्स, जाणून घ्या फिचर्स अन् किंमत

best smartphones launching august 2026 : ऑगस्ट महिन्यात गुगल पिक्सल, हॉनर, पोको, व्हिओ या कंपन्यांचे स्मार्टफोन्स लॉन्च होणार आहेत. काही स्मार्टफोन्स कॅमेरा आणि एआय फिचर्सवर लक्ष केंद्रित करू शकतात. तर काही त्यांच्या जबरदस्त डिझाइनमुळे चर्चेत राहण्याची शक्यता आहे. चला तर मग, ऑगस्ट महिन्यात लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सवर एक नजर टाकूया.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 30, 2026 12:44 PM
views 263  views

Upcoming SmartPhones in August 2026 : तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. येत्या ऑगस्टमध्ये भारतीय स्मार्टफोन बाजारात अनेक मोठे स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. गुगल आणि हॉनर सारख्या कंपन्या या महिन्यात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. तसेच काही स्मार्टफोन्स कॅमेरा आणि एआय फिचर्सवर लक्ष केंद्रित करू शकतात. तर काही त्यांच्या जबरदस्त डिझाइनमुळे चर्चेत राहण्याची शक्यता आहे. चला तर मग, ऑगस्ट महिन्यात लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सवर एक नजर टाकूया.

ऑगस्ट महिन्यात गुगल पिक्सल, हॉनर, पोको, व्हिओ या कंपन्यांचे स्मार्टफोन्स लॉन्च होणार आहेत.

हॉनर रोबोट फोन (Honor Robot Phone)

हॉनरचा 'रोबोट फोन' हा ऑगस्ट महिन्यात लॉन्च होणार आहे. हा सर्वात बहुप्रतिक्षित स्मार्टफोन आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा फोन १२ ऑगस्ट रोजी लॉन्च होईल. याला जगातील पहिला "रोबोट फोन" म्हणून ओळखले जात आहे. याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे याची रोबोटिक कॅमेरा प्रणाली. यामध्ये टायटॅनियमपासून बनवलेल्या फोल्डेबल गिम्बल कॅमेराचा समावेश असेल. तसेच या डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 8 इलाईट चिप आणि हॉनरची नवीन एजन्टीकओएस असण्याची अपेक्षा आहे. स्मार्टफोनमध्ये एआय आणि रोबोटिक्सचा समावेश असणार आहे.

गुगल पिक्सल 11 सिरिज (Google Pixel 11 Series)

गुगलची पिक्सल सिरीज देखील ऑगस्ट महिन्यातील सर्वात महत्वाच्या स्मार्टफोन लाँचपैकी एक असण्याची शक्यता आहे. अहवालांनुसार, पिक्सल 11 सिरीज जागतिक बाजारपेठेसोबतच भारतातही सादर केली जाऊ शकते. पिक्सल सिरीज तिच्या कॅमेरा आणि 'क्लीन' अॅन्ड्ऱॉईड अनुभवासाठी ओळखली जाते. नवीन सिरीजमध्ये गुगलच्या नवीन एआयची क्षमता, कॅमेरा आणि जबरदस्त परफॉर्मंस पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, स्मार्टफोनची भारतातील लॉन्चची तारीख किंवा किंमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

विओ वी 80 सिरिज (Vivo V80 Series)

विओ वी 80 सिरीज ही एक स्मार्टफोन कॅटेगरी आहे जी ऑगस्टमध्ये भारतात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. वी सिरीज विशेषतः तिच्या डिझाइन, कॅमेराची क्षमता आणि पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी ओळखली जाते. नवीन सिरीजमध्ये कॅमेरा हार्डवेअरसोबतच एआय-आधारित इमेजिंग क्षमता आणि उत्तम प्रोसेसिंग क्षमता असण्याची अपेक्षा आहे. विओ वी 80 सिरिजच्या किमती आणि मॉडेल्सबाबतची अधिक माहिती लाँचच्यावेळी जाहीर होण्याची शक्यता आहे.

विवो एस 2 (Vivo S2)

ऑगस्टमध्ये लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या यादीत विवो एस 2 चाही समावेश आहे. हा फोन विशेषतः तरुण युजर्सना तसेच स्टायलिश डिझाइन व सेल्फीच्या फिचर्सना प्राधान्य देणाऱ्यांना आकर्षित करेल अशी शक्यता आहे. विवोची एस सिरिज सहसा स्लिम डिझाइन आणि कॅमेराच्या गुणवत्तेवर भर देते. त्यामुळे विवो एस 2 मध्येही या फिचर्सवर लक्ष केंद्रित केले जाण्याची अपेक्षा आहे. याच्या लाँचची तारीख आणि फिचर्सबाबत अधिकृत माहितीची सध्या प्रतीक्षा आहे.

पोको एम 8 पॉवर 5 जी (POCO M8 Power 5G)

जर तुम्ही मोठ्या बॅटरीचा 5 जी स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर पोको एम 8 पॉवर 5 जी (POCO M8 Power 5G) हा एक चांगला पर्याय असू शकतो. रिपोर्टनुसार, हा फोन भारतात ४ ऑगस्ट रोजी लाँच होऊ शकतो. यात ६,५०० एमएएचची मोठी बॅटरी, ४५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट आणि १२० हर्टझ रिफ्रेश रेटसह ६.७२ इंचाचा फूल एचडी+ डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, ५० मेगापिक्सल एआय कॅमेरा आणि आयपी 64 रेटिंग यांसारखे फिचर्स असण्याचीही चर्चा आहे. मोठी बॅटरी आणि हाय-रिफ्रेश-रेट डिस्प्ले हे फिचर्स या फोनला मिड-रेंज कॅटेगरीमध्ये एक चांगला पर्याय बनू शकतो.