LIVE UPDATES

अबिद नाईक यांनी घेतले कणकवलीच्या राजाचे दर्शन

दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजाच्या सुखसमृद्धीसाठी गणरायाला साकडे
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 28, 2026 15:50 PM
views 42  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कणकवली : सर्वधर्मसमभावाची शिकवण जपत बहुजन समाजाच्या हितासाठी कार्यरत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवलीच्या राजाचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन राज्यात सुख-समृद्धी नांदावी,शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा आणि सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण व्हावे,यासाठी त्यांनी श्री गणरायाच्या चरणी साकडे घातले.कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने दरवर्षी कणकवलीच्या राजाच्या गणेशोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येते.

या गणेशोत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची जोड लाभली असून,शहरातील भाविकांसाठी हा उत्सव श्रद्धा,भक्ती आणि सामाजिक एकतेचा महत्त्वपूर्ण सोहळा ठरत आहे.यंदाही मोठ्या उत्साहात या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

नाईक यांचे कणकवलीच्या राजाशी गेल्या वीस वर्षांपासून अतूट भक्तिभावाचे नाते आहे.गेली दोन दशके ते "कणकवलीच्या राजाची" मनोभावे सेवा करीत असून,दरवर्षी या गणेशोत्सवात त्यांचा सहभाग असतो.धार्मिक श्रद्धेसोबतच सर्वधर्मसमभावाची भावना जपणारे त्यांचे हे कार्य सामाजिक सलोख्याचा संदेश देणारे आहे.यंदाही त्यांनी "कणकवलीच्या राजाचे" दर्शन घेतले आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होण्यासाठी गणरायाकडे प्रार्थना केली त्यावेळी कणकवली तालुका रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यथोचित सत्कार करण्यात आला

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कणकवली शहरातील नागरिक, भाविक,विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच रिक्षा चालक-मालक मोठ्या संख्येने एकत्र येतात.त्यामुळे या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा,बंधुभाव आणि एकतेची भावना अधिक दृढ होते.रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत असतात. 

गणेशोत्सव हा विघ्नहर्त्या श्री.गणेशाच्या आराधनेसोबतच समाजात एकोपा,सद्भावना आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा उत्सव आहे अशी भावना यावेळी अबिद नाईक यांनी व्यक्त केली.कणकवलीच्या राजाच्या दर्शनाच्या निमित्ताने श्री.अबिद नाईक यांनी व्यक्त केलेली ही प्रार्थना उपस्थित भाविकांच्या भावनांशी जोडली गेली.
 
 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सुभाष सावंत, शहराध्यक्ष इम्रान शेख, युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडूलकर, प्रांतिक सदस्य विलास गावकर, जिल्हा सचिव सतीश पाताडे, शहर सरचिटणीस विशाल पेडणेकर, ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर, रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संतोष सावंत, प्रसिद्ध निवेदक बाळू वालावलकर, चंद्रकांत सावंत, मनोज वारे यांच्यासह ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि रिक्षा चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.