LIVE UPDATES

हॉलीबॉलमध्ये गोगटे प्रशालेची दमदार कामगिरी

मुलींच्या संघाचा तालुक्यात प्रथम क्रमांक ; मुलांच्या संघाला द्वितीय स्थान
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 28, 2026 15:35 PM
views 31  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

देवगड : शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात गोगटे प्रशालेच्या मुलींच्या संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत देवगड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. 

तसेच १७ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रशालेच्या मुलांच्या संघाने तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला. दोन्ही संघांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राहिली आहे.या यशस्वी संघांना श्री. सतीशकुमार कर्ले यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्रशालेतून त्यांचे कौतुक होत असून, त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

यशस्वी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष अॅड. अजित गोगटे, सचिव प्रवीण जोग, क्रीडा समिती अध्यक्ष श्री. प्रशांत वारीक आणि मुख्याध्यापक श्री. सुनील जाधव यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.