LIVE UPDATES

६ जुलै पासून बेळगावात BSC मॉलची खास डिस्काउंट ऑफर

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: July 03, 2025 21:12 PM
views 963  views

बेळगाव : बेळगावमध्ये ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बीएससी टेक्स्टायल्स मॉलने ग्राहकांसाठी वार्षिक डबल डिस्काउंट बोनान्झा जाहीर केला आहे. या ऑफर बाबत BSC ग्रुपचे संचालक बीयू चंद्रशेखर यांनी गेल्या तीन वर्षांत मॉलला पाठिंबा देणाऱ्या गोव्यातील व  कोकणातील ग्राहकांचे आभार मानत या लागू केलेल्या ऑफरचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय. 


तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त, बीएससीने बेळगावमध्ये डबल डिस्काउंट ऑफरच्या विशेष योजनेची घोषणा केली. दावणगेरीमध्ये तीन दशकांहून अधिक काळ परिपूर्ण ग्राहक सेवा दिल्यानंतर, बीएससी गोव्यातील व कोकणातील खरेदीदारांसाठी मूल्य आणि प्रामाणिकपणाची तीच परंपरा पुढे चालवत आहे.


"जुन्या इन्व्हेंटरी स्टॉक क्लिअरन्स सेल करणाऱ्या सामान्य सवलतीच्या विक्रीपेक्षा, ही ऑफर ग्राहकांना अतुलनीय किमतीत उपलब्ध असेल यात ताज्या, उच्च-गुणवत्तेच्या मालासह सवलत देण्यात आलीय.

स्टोअर वर्षभर सर्व फ्रेश स्टॉक वर फ्लॅट १०% सवलत देते. आता ६ जुलै पासून सुरू होणाऱ्या ह्या उत्सवाच्या काळात, अतिरिक्त १०% सूट देण्यात आलीय. ज्यामुळे खरेदीदारांना नवीन वस्त्र प्रावरनांवर एकूण २०% सूट मिळते," चंद्रशेखर म्हणाले की, ही ऑफर रविवार, ६ जुलैपासून मर्यादित कालावधीसाठी सुरू राहणार आहे.


कपडे आणि घरगुती फर्निचर व्यतिरिक्त, महिलांसाठी उपलब्ध असलेल्या खऱ्या चांदीच्या दागिन्यांच्या आणि चांदीच्या भेटवस्तूंच्या विशेष संग्रहावरही सवलत वाढविण्यात आली आहे. हा संग्रह दुसऱ्या मजल्यावर महिलांच्या सेक्शन मध्ये उपलब्ध आहे. 


“वर्धापनदिन सवलत ऑफर सर्व विभागांमध्ये विस्तारित आहे, ज्यामध्ये साड्या, महिलांचे कपडे, पुरुषांचे कपडे, मुलांचे कपडे आणि घरगुती फर्निचर यांचा समावेश आहे. बीएससीचे व्हॅल्यू काउंटर हे एक प्रमुख आकर्षण आहे, जे कमी किमतीत प्रीमियम उत्पादने वितरीत करण्यासाठी ग्राहकांचे आवडते बनले आहेत,” यावर चंद्रशेखर यांनी विशेष लक्ष वेधले आहे. 


तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथील ग्राहकांचे आभार व्यक्त करताना, संचालक बी. सी. मृणाल यांनी ग्राहकांना मॉलला भेट देण्याचे, नवीन संग्रह एक्सप्लोर करण्याचे आणि या उत्सवी ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन केलेय. अधिक ग्राहक सेवेसाठी ९८४४९८८८११ किंवा ९८४४९७७७११ वर संपर्क साधता येईल असेही म्हटले आहे.