LIVE UPDATES

मळेवाडमध्ये गुरांना पाय-लागण सदृश आजाराची लक्षणे

भातपिकाच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांसमोर नवे संकट
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 28, 2026 05:43 PM
views 52  views

सावंतवाडी : मळेवाड परिसरात काही गुरांना पाय-लागण सदृश आजाराची लक्षणे दिसून येत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. अलीकडेच भातपिकाचे नुकसान झाल्याने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता पशुधनाच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

मळेवाड येथील शेतकरी प्रकाश नाईक आणि प्रवीण नाईक यांच्या गुरांना अचानक पायांचा त्रास जाणवू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच भातपिकाच्या नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना गुरांच्या आजारामुळे आणखी संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी कोंडुरे येथे एका शेतकऱ्याच्या बागेत गवा मृतावस्थेत आढळून आला होता. प्राथमिक अंदाजानुसार, या गव्याला पाय-लागण सदृश आजाराचा त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता.