LIVE UPDATES

१०० टक्के इथेनॉल इंधनाला केंद्राची मंजुरी, सामान्य पेट्रोल कारमध्ये वापर केल्यास काय होईल? वाचा सविस्तर

E100 Fuel in India : मोटार वाहन नियमांमध्ये करण्यात आलेल्या नव्या बदलांनुसार उत्सर्जनाच्या तरतुदीमध्ये ई ८५ इंधनासोबत ई १०० चादेखील समावेश करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ई ८५ आणि ई १०० इंधनाचा वापर केवळ यासाठी खास डिझाइन आणि प्रमाणित करण्यात आलेल्या विशेष वाहनांमध्येच करता येईल.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 26, 2026 06:46 PM
views 101  views
India updates motor vehicle rules covering E100 ethanol fuel for specially designed and certified flex-fuel vehicles.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात १०० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर चालणाऱ्या फ्लेक्स फ्युएल वाहनांसाठी (ई १००) नियम जारी केले आहेत. केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये बदल करत सरकारने ई १०० इंधनाला मंजुरी दिली आहे. काही कार कंपन्या त्यांच्या ई १०० कार बाजारात आणण्याच्या तयारीत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. 

अधिकृत निवेदनानुसार, मोटार वाहन नियमांमध्ये करण्यात आलेल्या नव्या बदलांनुसार उत्सर्जनाच्या तरतुदीमध्ये ई ८५ इंधनासोबत ई १०० चादेखील समावेश करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ई ८५ आणि ई १०० इंधनाचा वापर केवळ यासाठी खास डिझाइन आणि प्रमाणित करण्यात आलेल्या विशेष वाहनांमध्येच करता येईल. सरकारी निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, ई २० पेट्रोल किंवा सामान्य इंधनावर चालणारी वाहने ई ८५ किंवा ई १०० इंधनावर चालवता येणार नाहीत.

भारतात फ्लेक्स-फ्यूल वाहनांवर काम सुरू झाले आहे. या वर्षाच्या जून महिन्यात, मारुती सुझुकी इंडियाने 'वॅगनआर फ्लेक्स-फ्यूल' (WagonR Flex Fuel) लॉन्च केली. याला देशातील पहिली फ्लेक्स-फ्यूल प्रवासी कार म्हणून संबोधले गेले. ही कार ई 20 ते ई 100 पर्यंतच्या इथेनॉल-पेट्रोल मिश्रणावर चालू शकते. टोयोटा, टाटा मोटर्स आणि ह्युंदाईसारख्या कंपन्याही अशाच प्रकारच्या वाहनांचा विकास करत आहेत.

मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, २० टक्क्यांहून अधिक इथेनॉल (E100) असलेले इंधन केवळ अशा इंधनासाठी विशेषतः डिझाइन केलेल्या वाहनांमध्येच वापरले जाऊ शकते. अशा वाहनांना चाचणी पूर्ण झाल्यानंतरच वापरासाठी मंजुरी दिली जाते. सामान्य पेट्रोलवर चालणारी वाहने ई 85 किंवा ई 100 इंधनावर चालू शकत नाहीत. तसे केल्यास इंजिन आणि इतर भागांमध्ये बिघाड होऊ शकतो. मात्र, 'फ्लेक्स-फ्यूल'  वाहने पेट्रोलमध्ये विविध प्रमाणात मिसळलेल्या इथेनॉलवर चालण्यास सक्षम असतात.


ताजी बातमी

View all

Nitin Nabin to Visit Goa for BJP Organisational Review
Nitin Nabin Goa Visit : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवस गोवा दौऱ्यावर
October 26, 2026
श्रमदानातून जल-संवर्धनाचा संदेश
October 26, 2026
वनविभागाच्या आश्वासनानंतर बांबर्डेतील शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित
October 26, 2026
Local fishermen and kayaking project proponents discuss the proposed project at Bagwadi Jetty in Mithmumbari, Devgad.
Bagwadi Jetty Kayaking Project : कायाकिंग’ पाण्यात उतरण्याआधीच वादात बुडाले
October 26, 2026
संबंधित बातम्या

View all

Nitin Nabin to Visit Goa for BJP Organisational Review
Nitin Nabin Goa Visit : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवस गोवा दौऱ्यावर
October 26, 2026
9 Upcoming IPOs Opening This Week from October 26, 2026
IPO News : गुंतवणूकीची संधी! २६ ऑक्टोबरपासून 'या' ९ कंपन्यांचे आयपीओ खुले होणार, जाणून घ्या किंमत अन् तारखा
October 25, 2026
Florida Shooting Near University Stadium
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये विद्यापीठाजवळ गोळीबार, ६ मुलांसह १२ जण जखमी
October 25, 2026
Philippines Air Force Plane Crash : फिलिपिन्समध्ये हवाई दलाच्या दोन प्रशिक्षण विमानांची हवेत धडक
October 24, 2026