LIVE UPDATES

सिंधुदुर्गात ‘मृत्युंजय दूत’ महिलांचा गौरव

रूपा मुद्राळे व हेलन निब्रे यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते विशेष सन्मान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 28, 2026 05:12 PM
views 70  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस वाहतूक शाखा यांच्या मार्फत मृत्युंजय दूत एक दिवसीय कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मृत्युंजय दूत उपस्थित होते. यामध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे व हेलन निब्रे या मृत्युंजय दूत महिलांचा विशेष सन्मान पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर यांच्या हस्ते करण्यात आला. 

रस्त्यावर होणाऱ्या अपघातामध्ये या महिलांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले होते. या एकदिवशीय प्रशिक्षणामध्ये रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी याकरिता मृत्युंजय दूत व वाहतूक नियमन करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी मार्गदर्शन केले.

अपघातग्रस्त व्यक्तीला कशाप्रकारे मदत करायची याचे डेमो द्वारे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच वाहतूक पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला यांनी मृत्युंजय दूतांना  विषयी विशेष मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, विशेष शाखा पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, वाहतूक पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, सनी मोरजकर, रवी जाधव व जिल्ह्यातील मृत्युंजय दूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.